शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

‘मेडिकल’चा बधिरीकरण विभागच ‘बधीर’

By admin | Updated: July 11, 2017 01:09 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बधिरीकरण (अ‍ॅनेस्थेशिया) विभागाचा कारभार पूर्णत: ‘बधीर’ झाला आहे.

भूलतज्ज्ञांचा खासगी सेवेवर जोर : गोरगरीब रुग्णांना ठेवले जाते ‘वेटींग’वर सुरेंद्र राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बधिरीकरण (अ‍ॅनेस्थेशिया) विभागाचा कारभार पूर्णत: ‘बधीर’ झाला आहे. सर्व प्रमुख डॉक्टर खासगीत सेवा देत असल्याने शासकीय रुग्णालयातील रुग्णांना जाणीवपूर्वक वेटींगवर ठेवले जाते. विभाग प्रमुखच मनमानी करीत असल्याने इतर भूलतज्ज्ञाचे चांगलेच फावत आहे. शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया गृह संपूर्णपणे बधिरीकरण विभागावर अवलंबून आहे. शस्त्रक्रियेसाठी भुलतज्ज्ञांकडून फीट असल्याचा अहवाल आवश्यक असतो. येथील विभाग प्रमुखच प्रशासनाच्या नियंत्रणा बाहेर असून केवळ गप्पांचा फड रंगविणे इतकीच त्यांची उपलब्धी आहे. खासगी रुग्णालयात रात्रपाळी करून आलेले भुलतज्ज्ञ चक्क शासकीय रुग्णालयात कर्तव्यावर असताना विश्रांती घेतात. केवळ भुुलतज्ज्ञांच्या मनमानीने वेळेवर शस्त्रक्रिया होत नाही. अपेंडीसच्या रुग्णा अपेंडीस फुटेपर्यंत शस्त्रक्रिया होत नाही. बधिरीकरण विभागाची कार्यालयीन वेळ ही नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत आहे. यवतमाळात मात्र सोईस्करपणे यात बदल करण्यात आला. येथे सकाळी ९ ते दुपारी १ अशी वेळ करण्यात आली आहे. सकाळी १० वाजताशिवाय येथे कोणी येत नाही आणि दुपारी १२ नंतर खासगी रुग्णालयाच्या घाईने निघून जातात. शस्त्रक्रियेसाठी वॉर्डामध्ये खोळंबेलेल्या रुग्णांशी काहीच सोयरसूतक नाही. बधीरीकरण विभागच्या प्रमुुखाने मागील दहा वर्षात एकाही रुग्णाला ‘अ‍ॅनेस्थेशिया’ दिला नाही. कधी शस्त्रक्रिया गृहाचे कपडेच घातले नाही. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यास या महायशयांची नोकरीच अडचणीत येऊ शकते. केवळ रुग्णालया प्रशासनाची मर्जी असल्याने या प्राध्यापकाचे फावत आहे. सर्वाधिक डॉक्टर पण उपयोग शून्य एमसीआयच्या निकषाप्रमाणे बधिरीकरण विभागातील पदे भरली आहे. येथे एक प्राध्यापक, तीन सहयोगी प्राध्यापक आणि चार अधिव्याख्याता आहे. येवढा स्टाफ इतर कोणत्याच विभागात नाही. त्यानंतरही येथील एका सहयोगी प्राध्यापकाने तीन वर्षात अ‍ॅनेस्थेशियाचा ‘भोपळा’ फोडला नाही. स्त्रीरोग शस्त्रक्रिया गृहात न बसता केवळ विभाग प्रमुखांसोबत अवांतर चर्चा करण्यातच त्यांचा वेळ जातो. कार्यालयीन वेळेत खासगी कामे आटोपून दुपारी १ वाजता मेडिकलमध्ये परत येतात. तर दुसरे सहयोगी प्राध्यापक खासगीत सेवा देण्यातच ‘संतोष’ मानतात. त्यांची उपस्थिती एक तासापेक्षा अधिक वेळ कधीच नसते. बरोबर ११ वाजता ते खासगी रुग्णलयातील ड्युटीसाठी निघतात.‘मेडिकल’मध्ये अनफिट रुग्ण खासगीत फिट शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी वारंवार अनफिट दाखवून शासकीय रुग्णालयात ताटकळत ठेवले जाते. त्याच रुग्णाला तोच भुुलतज्ज्ञ खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी फिट दाखवतो. यावरून एका भूलतज्ज्ञाला रुग्णाच्या रोषाचाही सामना करावा लागला होता.