शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणाचे बॅग लिफ्टर जेरबंद

By admin | Updated: June 12, 2017 01:58 IST

एसटी बसमधील प्रवाशांची बॅग चिरुन ऐवज लंपास करणारी हरियाणातील चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी यवतमाळात

तिघे पसार : यवतमाळ बसस्थानकावर टोळी विरोधी पथकाची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एसटी बसमधील प्रवाशांची बॅग चिरुन ऐवज लंपास करणारी हरियाणातील चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी यवतमाळात शनिवारी रात्री टोळी विरोधीपथकाने जेरबंद केली. सातपैकी चार चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. यवतमाळसह अनेक ठिकाणी चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.यवतमाळ बसस्थानकावर गत काही दिवसात बॅग लंपास होण्याच्या घटना घडल्या. परंतु चोरटे हाती लागत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी महिला पोलीस विभावरी ढवस, वैशाली मेंढे यांना साध्या वेषात तैनात केले. दोन महिन्यानंतर शनिवारी रात्री सुगावा लागला. पोलिसांनी सापळा रचून चौघांना बसस्थानकावरून शनिवारी रात्री अटक केली. सुनील कुमार छोटाराम मलक (माला) (३३), विरेंद्रकुमार श्रीभरतसिंग माला (३२) दोघे रा. अशफरगढ ता. जिंद (हरियाणा), राकेशकुमार छत्रसिंग बिडू (३३) रा. जैब्रान ता. मेहर जि. रोहतक (दिल्ली), प्रकाश खुलाराम माला (५०) रा. सुलतानपुरी शनिबाजार रोड, जुनी दिल्ली, अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहे. राकेशकुमार बिडू याच्या खिशात चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळले. बॅग फाडणे व लॉक तोडण्यासाठी टी आणि एल आकाराचे धारदार शस्त्रही आढळले. त्यांनी यवतमाळात महिलांचे दागिने लंपास केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात टोळीविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक प्रशांत गिते, उपनिरीक्षक संतोष मनवर, संजय दुबे, गजानन धात्रक, किरण पडघन, अमोल चौधरी, योगेश गटलेवार, किरण श्रीरामे, आशिष गुल्हाने, विनोद राठोड, बंडू मेश्राम, आकाश सहारे, गौरव ठाकरे, जयंत शेंडे, प्रवीण मेंगरे यांनी केली.भाषेने बिंग फुटले बसस्थानक परिसरात काही जण वेगवेगळ्या भाषेत चर्चा करीत होते. ही भाषा आपल्याकडील नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावरून त्यांना ताब्यात घेतले आणि या टोळीचे बिंग फुटले. यवतमाळवरून दोन महिलांचे दागिने लंपास केल्याची कबुली दिली. यामध्ये यवतमाळ-कारंजा प्रवासात ७ फेब्रुवारी रोजी सरला महाजन यांचे ७० हजारांचे दागिने चोरी गेले होते. या घटनेचा छडा लागला असून मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे.अशी आहे गुन्ह्याची पद्धतहरियाणातील ही टोळी दिल्लीवरुन नागपूरला उतरल्यानंतर चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, चिखली, जालना असा प्रवास सातत्याने करते. प्रवासादरम्यान सौजन्याचा आव आणूण महिला, वृद्ध यांना बसमध्ये बसायला जागा देणे, बसस्थानकावर जड बॅग असलेल्यांना मदत करणे, अशा पद्धतीने सलगी करून ही टोळी गुन्हे करते. सभ्यतेचा आव आणून गुन्हा करण्याची पद्धत आहे. चोरीचा माल हरियाणात विक्रीसाठी नेला जात असल्याचे त्यांनी सांगितले.