शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
3
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
4
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
6
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
7
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
8
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
9
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
11
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
12
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
13
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
14
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
15
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
16
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
17
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
18
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
19
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
20
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 

ज्ञान मंदिर नव्हे अन्न छत्रालय!

By admin | Updated: December 21, 2014 23:06 IST

ग्रामीण भागातील मुलांचे कुपोषण थांबावे, शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबावी यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेने ज्ञान मंदिराला

पुसद : ग्रामीण भागातील मुलांचे कुपोषण थांबावे, शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबावी यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेने ज्ञान मंदिराला अन्नछत्रालयाचे स्वरूप आले असून कल्याणकारी योजनांची खिचडी झाल्याचे प्राथमिक शाळांमध्ये दिसून येत आहे. सर्व शिक्षा अभियानाने शिक्षकांना ‘शिक्षा’ दिल्याचे सध्या तरी दिसत आहे. शासनाने मध्यान्ह भोजन ही योजना सुरू केली. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार दिला जातो. शाळांमध्ये खिचडी शिजवून विद्यार्थ्यांना वितरणाची जबाबदारी अनेक गावांमध्ये बचत गटांकडे दिली आहे. शाळांमध्ये किचन शेड उभारण्यात आले आहे. मात्र अप्रत्यक्ष जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांवरच येऊन पडते. वरकरणी बचत गट दिसत असले तरी शिक्षकांना यामध्ये गुंतून पडावे लागते. सर्वशिक्षा अभियानाने अनेक सकारात्मक बदल झाले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांच्या पोषणाची जबाबदारी शासनाने शिक्षकांकडे दिली आहे. वरकरणी कल्याणकारी वाटणाऱ्या या योजनेची झळ शिक्षकांना बसत आहे. प्रत्येक शाळेतल्या किमान हजार-दीड हजार मुलांना प्रत्येक दिवशी जेवण देणे, त्या अनुरोधाने तांदूळ, त्याचा हिशेब लिहिणे, खिचडी शिजवून घेणे, वितरण करणे आदी जबाबदारी पार पाडावी लागत आहे.२० मिनिटांच्या मधल्या सुटीत स्वत:चा चहा बाजूला ठेऊन मुलांची खिचडी वाटप करणे, त्यानंतर शाळेत निर्माण झालेल्या भटार खाण्याला टापटीप करणे आदी कामे करावी लागतात. तर काही ठिकाणी खिचडीत काय निघाले अशा तोंडी तक्रारींनाही तोंड द्यावे लागते. जणू ज्ञान मंदिर आता अन्न छत्रालय झाल्याचे दिसत आहे. शालेय पोषण आहार योजना निश्चितच कल्याणकारी आहे. पण त्यात शाळेला कितपत गुंतविणे योग्य आहे. ग्रामीण भागात ही योजना अतिशय उत्तम परंतु शहरी भागात आपला डबा घरुन घेऊन येणाऱ्यांसाठी ही योजना कुचकामी ठरत आहे. शाळा हे ज्ञानदानाचेच केंद्र असावे तेथे शिक्षणच मिळावे. मात्र सध्या ज्ञानदानासोबत खिचडी वाटपही शिक्षकांना करावी लागत आहे. भविष्यात कल्याणकारी योजनांची खिचडी होऊ नये, एवढे मात्र बघावे. (वार्ताहर)