शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

चक्क रुग्णवाहिकेतून गुटखा तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 05:00 IST

आर्णी येथून एमएच-२९ - टी-३२५६ क्रमांकाची रुग्णवाहिका यवतमाळकडे निघाली. शहरालगतच्या अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर आर्णी मार्गावर ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीवरून ही रुग्णवाहिका थांबविली. मंगळवारी रात्री या रुग्णवाहिकेची पोलिसांनी झडती घेतली. त्यामध्ये सीटच्या खाली गुटख्याची तीन पोती दडविलेली आढळून आली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुटखा तस्करीचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. यामधून कोट्यवधींची उलाढाल होत आहे. त्यामुळे अनेकांनी या अवैध व्यवसायात पैसा गुंतवला आहे. यातून मिळणारा काळा पैसा पांढरा करणारा वर्गही वेगळाच आहे. दरम्यान, तस्करीसाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे. आर्णी येथून यवतमाळात गुटखा घेऊन येणारी रुग्णवाहिका ग्रामीण पोलिसांनी आर्णी रोडवर तपासली. तेव्हा हे वास्तव बाहेर आले. आर्णी येथून एमएच-२९ - टी-३२५६ क्रमांकाची रुग्णवाहिका यवतमाळकडे निघाली. शहरालगतच्या अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर आर्णी मार्गावर ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीवरून ही रुग्णवाहिका थांबविली. मंगळवारी रात्री या रुग्णवाहिकेची पोलिसांनी झडती घेतली. त्यामध्ये सीटच्या खाली गुटख्याची तीन पोती दडविलेली आढळून आली. त्यानंतर रुग्णवाहिकेतील प्रदीप थावरा राठोड (२७), सय्यद रहेमान सय्यद उमर (२४), रुग्णवाहिकेचा चालक अनिल डुड्डेकर (२३) (तिघे रा. अमराईपुरा आर्णी)  यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी अन्न निरीक्षक घनश्याम दंदे यांच्या तक्रारीवरून कलम २७२, २७३, ३२८, १८८, ३४ भादंवि तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्यातील २६ (२), २७, ३० (२) (ए) ५९ या कलमानुसार ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात जमादार कैलास लोथे, संदीप मेहेत्रे, रुपेश नेवारे, विक्की राऊत, जांभुळकर आदींनी केली. 

आर्णी शहर गुटखा तस्करीचे मुख्य केंद्र- लगतच्या तेलंगणा राज्यातून प्रतिबंधित गुटखा आणला जातो. आर्णीत गुटखा साठविण्याचे मोठे गोदाम आहे. २१ नोव्हेंबरला पारवा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पथकाने १० लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त केला होता. त्या गुन्ह्यातील सलीम शेख गफूर, महेबूब शेख सादीक हे दोघे पसार झाले होते. आर्णीतूनच यवतमाळ, अमरावती, वाशिम, नागपूर या ठिकाणी गुटखा पाठविला जातो. विशेष करून किराणा मालाच्या  आडून गुटख्याची तस्करी करण्यात येते. हे मोठे रॅकेट अजूनही पोलिसांना उघड करता आले नाही. या व्यवसायातील व्हाईट कॉलर गुन्हेगार पोलीस कारवाईपासून दूर आहेत. 

 

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीSmugglingतस्करी