शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादात नातवाने केला आजोबाचा खून

By admin | Updated: July 10, 2016 01:40 IST

शेतीच्या वादातून तरुण नातवाने वृद्ध आजोबाचा खलबत्त्याने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना यवतमाळ ग्रामीण पोलीस

यवतमाळ : शेतीच्या वादातून तरुण नातवाने वृद्ध आजोबाचा खलबत्त्याने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कीटा गावात घडली. शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेची फिर्याद शनिवारी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. मारोती केजा घोटेकर (७०) रा. किटा असे मृताचे नाव आहे. त्यांच्या घरात गेल्या काही दिवसांपासून शेतीचा वाद होता. या वादातून शुक्रवारी घरात भांडण झाले. या भांडणातच १८ वर्षीय अजय वसंत घोटेकर या नातवाने मारोती यांना खलबत्त्याने मारुन गंभीर जखमी केले. मारोती यांना तेथून मुलीच्या घरी मार्तंडा येथे जखमी अवस्थेत नेण्यात आले होते. तेथे त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी अजयविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी ठाणेदार संजय डहाके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनुप वाकडे, जमादार राजकुमार आडे तपास करीत आहे. महानिरीक्षकांचे डिटेक्शनचे आदेशयवतमाळ : यवतमाळसह पाच जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक शनिवारी अमरावतीत पार पडली. त्यात विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी गुन्हेगारीचा आढावा घेतला. यवतमाळातील प्रॉपर्टी व शरीरासंबंधीच्या वाढत्या गुन्ह्यांबाबत महानिरीक्षकांनी चिंता व्यक्त करताना डिटेक्शनचे तसेच न्यायालयीन खटल्यातील शिक्षेचे प्रमाण वाढविण्याचे आदेश दिले. कायदा व सुव्यवस्था, पोलीस व समाजातील समन्वय यावरही भर देण्याच्या सूचना विठ्ठल जाधव यांनी दिल्या.