शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय जलतरण तलावातील पाण्याविषयी साशंकता कायम

By admin | Updated: May 28, 2017 00:51 IST

जलतरणाचे प्रशिक्षण घेणाऱ्या ७० ते ८० विद्यार्थ्यांवर अजूनही विविध रुग्णालयात उपचार केले जात आहे.

संसर्गाची भीती : जलतरण प्रशिक्षणार्थ्यांवर उपचार सुरूच लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जलतरणाचे प्रशिक्षण घेणाऱ्या ७० ते ८० विद्यार्थ्यांवर अजूनही विविध रुग्णालयात उपचार केले जात आहे. पाण्याच्या संसर्गानेच हे प्रशिक्षणार्थी आजारी पडल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितल्याने पालकांची चिंता वाढली आहे. जिल्हा क्रीडा संकुल समितीमार्फत येथील आझाद मैदानातील शासकीय जलतरण तलावाचे संचालन केले जाते. उन्हाळा असल्याने प्रशिक्षणार्थ्यांची संख्या अधिक आहे. ७०० ते ८०० प्रशिक्षणार्थी या तलावात सराव करत आहे. मात्र या तलावात प्रशिक्षण घेत असलेल्या ६ ते १६ वर्षे वयोगटातील प्रशिक्षणार्थ्यांना ताप, हगवण, उलट्या, घशामध्ये फोडं, डोळे पांढरे करणे यासारख्या प्रकाराने त्रस्त करून सोडले आहेत. यातील ७० ते ८० जणांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत. काही जण दोन आठवड्यापासून रुग्णालयात दाखल आहे. या जलतरण तलावत प्रशिक्षण धेऊन पुणे येथे होत असलेल्या स्पर्धेसाठी रवाना झालेले तीन स्पर्धकही आजारी पडल्याने तेथे उपचार घेत आहेत. यवतमाळ शहरात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना डॉक्टरही आता तुम्ही स्विमिंग करताहेत काय, असा प्रश्न विचारत आहे. होकार मिळाल्यास पहिल्या रुग्णावर सुरू असलेल्या उपचारानुसार औषधोपचार केले जात आहे. पालकांनी या संदर्भात कुठेही तक्रार केली नसली तरी, मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर जिल्हाधिकारी, क्रीडा आयुक्त तसेच पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.