शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

खुशखबर...१३ लाख पुस्तके आली!

By admin | Updated: May 28, 2017 00:48 IST

शाळा सुरू झाल्यावरही पुस्तके न मिळणे, हा किस्सा यंदा इतिहासजमा होण्याची शक्यता आहे.

तालुक्याला साठा : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार अविनाश साबापुरे । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शाळा सुरू झाल्यावरही पुस्तके न मिळणे, हा किस्सा यंदा इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. कारण महिनाभरापूर्वीच प्राथमिक शाळांची १३ लाख पुस्तके जिल्ह्यात येऊन पोहोचली आहेत. त्यामुळे २७ जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांच्या हाती कोरी करकरीत पुस्तके त्यांच्या हव्याहव्याशा सुगंधासह पडणार आहेत. मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत यंदा एप्रिल महिन्यातच बालभारतीकडे पुस्तकांची मागणी आॅनलाईन नोंदविण्यात आली होती. सर्वशिक्षा अभियानातून जिल्ह्यासाठी २०१७-१८ सत्राकरिता एकंदर १७ लाख ३९ हजार ६५३ पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. दरवर्षी दोन महिन्यांपूर्वी मागणी नोंदवूनही ऐन शाळा सुरू होता-होता पुस्तके शाळांपर्यंत पोहोचायची. मात्र, यंदा मे महिन्यातच तब्बल १३ लाख १५ हजार ४६० पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. म्हणजेच ७६ टक्के पुस्तकांचा साठा महिनाभरापूर्वीच पोहोचला आहे. उर्वरित ४ लाख २४ हजार १९३ पुस्तकेही पुरवठ्याच्या प्रक्रियेत आहेत. यात बाभूळगाव, झरी जामणी, राळेगाव आणि मारेगाव या तालुक्यांचा पुरवठा बाकी आहे. शिक्षकांच्या आधी पोहोचणार पुस्तके जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया अद्याप खोळंबलेली आहे. ऐन शाळा सुरू होण्याच्या कालावधीत बदल्या झाल्यास शाळेच्या पहिल्या दिवशी आठवडाभरात दुसऱ्या शाळेत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठीची पुस्तके बालभारतीच्या अमरावती डेपोमधून थेट तालुकापातळीवर पोहोचली असून आता शाळांपर्यंत पोहोचविली जाणार आहेत. शाळेला शिक्षक मिळण्यापूर्वीच पुस्तके पोहोचण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यंदा शाळेचा पहिला दिवस ‘पुस्तक दिन’ म्हणून साजरा होणार आहे.