शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कुमारीमातेच्या प्रज्ञावंत कन्येला अखेर मिळाले जात प्रमाणपत्र

By admin | Updated: September 9, 2016 02:49 IST

जात प्रमाणपत्राअभावी एका कुमारी मातेच्या प्रज्ञावंत कन्येचे शैक्षणिक भविष्यच टांगणीला लागले होते.

महसूलचा पुढाकार : अनेकांनी दिला मदतीचा हात उमरखेड : जात प्रमाणपत्राअभावी एका कुमारी मातेच्या प्रज्ञावंत कन्येचे शैक्षणिक भविष्यच टांगणीला लागले होते. प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही तिला जात प्रमाणपत्र मिळत नव्हते. अखेर ‘लोकमत’मध्ये तिची कहाणी प्रसिद्ध झाली. महसूल विभाग खडबडून जागा झाला. सामाजिक संघटना आणि महसूल विभागाच्या पुढाकारातून अखेर गुरुवारी त्या कन्येला जात प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. उमरखेड तालुक्यातील जनुना येथील एका कुमारी मातेची कन्या पुसद येथे नवव्या वर्गात शिकत आहे. परंतु वडील नसल्याने जात प्रमाणपत्रासाठी अडचण येत होती. जात प्रमाणपत्र नसल्याने तिला विविध सवलतींचाही लाभ मिळत नव्हता. शिक्षक दिगांबर तडोले आणि नागोराव बुरकुले यांच्या सहकाऱ्याने गत सहा महिन्यांपासून ती महसूलचे उंबरठे झिजवित होते. तिचा हा संघर्ष सुरू होता. परंतु प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. अखेर ‘लोकमत’मध्ये ‘कुमारी मातेची प्रज्ञावंत कन्या शोधतेय जात’ असे वृत्त प्रसिद्ध झाले. अंगावर शहारे आणणारे हे भयानक वास्तव प्रकाशित होताच सांगली येथील जयश्री सावंत, यवतमाळ येथील प्रमोदिनी रामटेके, अमरावतीच्या आशा गालट यांनी पुढाकार घेतला. अमरावती विभागीय आयुक्त, यवतमाळचे जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून सदर मुलीला जात प्रमाणपत्र देण्यासाठी विनंती केली. यवतमाळ येथील अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी यासाठी पुढाकार घेतला. उमरखेडचे उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांना जात प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार उमरखेड तहसीलदार भगवान कांबळे यांनी तिच्या कागदपत्रांची पूर्तता केली. यासाठी तलाठी सचिन फटाले, मंडळ अधिकारी एस.पी. मून, नायब तहसीलदार सुधीर देशमुख यांनी पुढाकार घेतला. संपूर्ण प्रकरण तयार करून उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्याकडे पाठविण्यात आले. शासकीय सोपस्कार पार पाडून गुरुवारी सदर कन्येला रितसर जात प्रमाणपत्र देण्यात आले. आता तिच्या शैक्षणिक प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. (शहर प्रतिनिधी)‘लोकमत’चे मानले आभार जनुना येथील कुमारीमातेच्या कन्येला जात प्रमाणपत्रासाठी ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला. अखेर सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनातील सहृदयी अधिकाऱ्यांमुळे या कन्येला जात प्रमाणपत्र मिळाले. शिक्षक दिगांबर तडोले व नागोराव बुरकुले यांनी तिला साथ दिली. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळेच जात प्रमाणपत्र मिळाले, असे म्हणत दिगंबर तडोले यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.