शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

महागावचे पाणी पुसद तालुक्यात वळविण्याचा घाट

By admin | Updated: January 8, 2016 03:23 IST

पूस धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी कासोळा ते मोरवाडीपर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू असून यासाठी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी नुकतीच या भागाची पाहणी केली.

सिंचनावर टाच : कासोळा ते मोरवाडी मार्गाची पाहणी महागाव : पूस धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी कासोळा ते मोरवाडीपर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू असून यासाठी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी नुकतीच या भागाची पाहणी केली. महागाव तालुक्याचे पाणी पुसद तालुक्यात पळविण्याचा हा घाट असून यामुळे महागाव तालुक्याची सिंचन क्षमता पुन्हा कमी होणार आहे. महागाव तालुक्यातील कासोळा, कान्हा, सारखणी, गुंज, सवना या परिसराला पूस धरणाचे पाणी पुरविण्यात येते. परंतु आता पाण्यात कपात करून हेच पाणी कासोळ्यापासून काळी दौलत मार्गावर असलेल्या मोरवाडी, कौडगाव, कासोळा भागात फिरविण्याचा विचार सुरू आहे. पूस धरणाची सिंचन क्षमता पाच हजार ९९९ हेक्टर आहे. प्रत्यक्षात तवढे सिंचन होत नाही. रबी तीन हजार ८०८ हेक्टर, उन्हाळी ५४९, खरीप ५३३ हेक्टर असे चार हजार ८९० हेक्टर सिंचन कागदोपत्री गृहित धरले गेले आहे. यातून पाण्याचा अपव्यय होत असल्याने प्रत्यक्षात चार हजार हेक्टरपर्यंतच ओलित होत आहे. पुस धरणात सध्या ६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उजवा कालवा २५ किलोमीटर तर डावा कालवा ३८ किलोमीटर आहे. डाव्या कालव्यावरूनच सर्वाधिक सिंचन होते. प्रकल्पाचे पाणी इटावा, लोणी, आरेगाव, पाळोदी, भाटंबा, हुडी, पिंपळगाव, कासोळा, कान्हा, सारखणी, गुंज, वेणी, सवना शिवारापर्यंत जाते. कासोळा, कान्हा, सवना गावातील शेतकऱ्यांना अधर पूस प्रकल्पाचे पाणी अंशत: मिळते. हाच मुद्दा पुढे करून पाणी कपातीचा घाट रचला जात आहे. पाणी कासोळा ते मोरवाडी, कौळगाव आणि कासोळा शिवारातील शेतीला कसे पुरविता येईल याचा शोध घेण्याचे अलिखित आदेश मिळाल्याची माहिती आहे. त्याच अनुषंगाने ३० डिसेंबर रोजी या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गोरडे यांनी पाहणी केली. पाणी वळविण्याचा विचार सुरू असला तरी शासनाची मंजुरी तांत्रिक मान्यता आदी बाबींना वेळ लागणार आहे.एकंदरित महागाव तालुक्यातील पाण्यावर आता पुसद तालुक्याचा डोळा असून या प्रकारामुळे शेतकऱ्यात चांगलाच रोष निर्माण झाला आहे. (शहर प्रतिनिधी)