शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशवाडी ग्रामपंचायतीला पाच लाखांचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन अंतर्गत महाराष्टÑ शासनाच्या माध्यमातून टाटा व रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने गावाचा शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मिशन अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये मुख्यमंत्री ग्रामविकास दूत नेमण्यात आले. याच अनुषंगाने तालुक्यातील गणेशवाडी ग्रामपंचायतीला पाच लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री ...

ठळक मुद्देकळंब तालुका : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीईओ, ग्रामदूताने स्वीकारला मुंबईत पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन अंतर्गत महाराष्टÑ शासनाच्या माध्यमातून टाटा व रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने गावाचा शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मिशन अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये मुख्यमंत्री ग्रामविकास दूत नेमण्यात आले. याच अनुषंगाने तालुक्यातील गणेशवाडी ग्रामपंचायतीला पाच लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा, आनंद महिंद्रा आदींच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपककुमार सिंगला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तत्पूर्वी ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन अंतर्गत महाराष्टÑातील आठ जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गावांतील कामाचे सादरीकरण केले. यवतमाळ जिल्ह्याचे सादरीकरण सीईओ डॉ. दीपककुमार सिंगला यांनी केले. यवतमाळ जिल्ह्याचे सादरीकरण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उत्कृष्ठ ठरले.या मिशनअंतर्गत जिल्ह्यातील २३ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. त्यात कळंब तालुक्यातील दहा गावांचा समावेश करण्यात आला होता. यापैकी गणेशवाडीच्या विकासात्मक आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्री व प्रमुख पाहुण्यांच्या पसंतीस पडले. त्यामुळे गणेशवाडीला पाच लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला. निवड झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविकास दूतांची निवड करण्यात आली. दूतांच्या माध्यमातून गाव व ग्रामपंचायतीचा अभ्यास करणे, जास्तीत-जास्त लोकांच्या सहभागातून ग्रामविकासचा आराखडा तयार करणे, शासकीय यंत्रणांशी समन्वय आदी कामे केली जातात. गणेशवाडी या गावाला पुरस्कार मिळण्यासाठी गटविकास अधिकारी डॉ. मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, ग्रामसेवक गणेश जाधव, ग्रामविकास दूत मयुरी महातळे यांची भूमिका महत्त्वाची ठरली.गणेशवाडी ग्रामपंचायत सर्वोत्कृष्ट - सीईओमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांनी गणेशवाडी गावाच्या सादरीकरणास पसंती दिली. त्यावरून या पुरस्काराची घोषणा झाली. आता या निधीतून गावाचा विकास साधला जाईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपककुमार सिंगला यांनी दिली.