शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

भाजपाच्या कळंब तालुका अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी

By admin | Updated: December 19, 2015 02:30 IST

भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका चालू महिन्याच्या अखेरीस पार पडणार आहे. यात तालुकाध्यक्ष पदाचाही समावेश आहे.

कळंब : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका चालू महिन्याच्या अखेरीस पार पडणार आहे. यात तालुकाध्यक्ष पदाचाही समावेश आहे. त्यामुळे कळंब तालुकाध्यक्षपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी, यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विद्यमान तालुकाध्यक्ष शंकर मांढरे हे पुन्हा अध्यक्षपद मिळेल, अशी अपेक्षा ठेऊन आहे. या पदावर नवीन चेहरा दिला जाईल, हे निश्चित मानले जाते. त्यामुळे या पदावर आपलीच वर्णी लागावी, यासाठी अनेकांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. ऐनवेळी मतदान झाल्यास आपल्या बाजूने पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शवावी, यासाठी मनधरणी केली जात आहे. ‘आत्मा’ समितीचे अध्यक्ष असलेले कैलास बोंद्रे, माजी अध्यक्ष सुरेश महाजन, विजय नवाडे, सुरेश केवटे, विद्यमान अध्यक्ष शंकर मांढरे यांची नावे या पदासाठी चर्चीली जात आहे. पक्षश्रेष्ठीकडूनही याच नावावर विचार केला जात आहे. अध्यक्षपदासाठी सर्वांचे एकमत व्हावे, अशी जिल्हा पदाधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. परंतु स्थानिक भाजपात अनेक गटतट आहे. कोणाचा पायपोस कोणाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आमदार डॉ.अशोक उईके यांच्या मध्यतीशिवाय कोण्या एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी स्थिती नाही. त्यामुळे आमदार डॉ.उईके कोणाच्या पारड्यात वजन टाकतात, हेच महत्त्वाचे ठरणार आहे. तालुक्याचा अध्यक्ष कळंब शहराचा रहिवासी असावा, अशी स्थानिक पदाधिकाऱ्यांची भावना आहे. यामागे बाहेरच्या उमेदवारांचा पत्ता कट करण्याचा डाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष राजू डांगे म्हणाले, संघटनात्मक निवडणुकीला सुरुवात झाली आहे. सर्व सहमतीने पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचा प्रयत्न आहे. एकमत न झाल्यास पक्षाच्या घटनेप्रमाणे निवडप्रक्रिया राबविली जाईल, असे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)