शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांच्या थकबाकीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: December 17, 2015 02:38 IST

मंजूर झालेला ग्रेड पे केवळ निधी नसल्याने अडला होता. मात्र आता ग्राम विकास विभागाने पुरवणी मागणीत यासाठीचा निधी मंजूर केला आहे.

निधी मंजूर : राज्य ग्रामसेवक संघाच्या प्रयत्नांना यशाचा दावायवतमाळ : मंजूर झालेला ग्रेड पे केवळ निधी नसल्याने अडला होता. मात्र आता ग्राम विकास विभागाने पुरवणी मागणीत यासाठीचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यभरातील ग्रामसेवकांच्या थकबाकीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाने केलेल्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचा दावा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून करण्यात आला आहे. ग्रामविकास अधिकारी हे ग्रामसेवकाचे वरिष्ठ वेतनश्रेणीतील आणि पदोन्नतीचे पद असल्याने वरिष्ठ पदाचा चार हजार २०० रुपये ग्रेड पे देण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, ९ सप्टेंबर २०१४ च्या शासन निर्णयाने ग्रामविकास अधिकारी पदास तीन हजार ५०० ग्रेड पे १ आॅक्टोबर २०१४ पासून मंजूरी दिली. विधिमंडळाच्या मान्यतेनंतर निधी वितरणाचे आदेश देण्यात आले होते. मात्र यासाठी विलंब झाला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक मंडळाच्या शिष्टमंडळाने पाठपुरावा केला. दरम्यान ग्रामविकास विभागाने पुरवणी मागणीस मंजूरी दिली आहे. यातून ग्रामसेवकांना वाढीव ग्रेड पेपोटीची थकबाकी मिळणार आहे. वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य ग्रामसेवक संघाला हे यश आल्याचे राज्याध्यक्ष विजय मसकर, सरचिटणीस के.आर. विरूळकर यांनी म्हटले आहे. या संदर्भातील माहिती अमरावती विभाग अध्यक्ष श्यामसुंदर हजारे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुभाष भोयर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद मोरे यांनी कळविली आहे. (वार्ताहर)