शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

धामणगाव रोडवर चौघांना लुटले

By admin | Updated: May 20, 2016 02:02 IST

येथील धामणगाव मार्गावरील शासकीय तंत्रनिकेतनसमोर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एकाच वेळी चौघांना लुटल्याची घटना घडली.

मध्यरात्रीची वाटमारी : १७ हजार लंपास, ‘नानू’ टोळीचा धुडगूस, दोन अल्पवयीनांचा समावेशयवतमाळ : येथील धामणगाव मार्गावरील शासकीय तंत्रनिकेतनसमोर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एकाच वेळी चौघांना लुटल्याची घटना घडली. चोरट्यांनी १७ हजार रुपये रोख व मोबाईल लंपास केले. दरम्यान या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच चार्ली पथकाच्या मदतीने अवघ्या काही तासातच वाटमारी करणाऱ्या चौघांनाही अटक केली.यवतमाळच्या मैथिलीनगरात राहणारे नंदू लहुजी आदबाने (५२) हे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेतातून आपल्या घरी जात होते. धामणगाव मार्गावर त्यांची दुचाकी चौघांनी अडविले. शस्त्राच्या धाकावर त्यांच्याजवळील रोख व मोबाईल लंपास केला. याच पाठोपाठ स्वप्नील, दीपक, कपिले या तीन तरुणांनाही अडवून मारहाण करीत त्यांच्याजवळून ऐवज लुटला. या प्रकाराने घाबरलेल्या चौघांनी तत्काळ यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ चार्ली पथकाच्या मदतीने शोध सुरू केला. तेव्हा एका दुचाकीवर पहाटे ४.३० वाजता रविदासनगरातून चौघे जण पळून जाताना आढळून आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये नानू उर्फ कार्तिक सुरेश दांडेकर (२३) रा. रवीदासनगर, अक्षय गजानन चौधरी (२०) रा. चमेडियानगर आणि दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळून घटनेत वापरलेली दुचाकी क्र.एम.एच.२९-एएस-७८२८ जप्त करण्यात आली. नानू दांडेकर हा या घटनेचा मुख्य सूत्रधार असून त्याच्यावर अनेक चोरीचे गुन्हेही दाखल आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर, विनोद राठोड, गुणवंत गोईनवार, महेश मांगूळकर यांनी केली. यवतमाळ शहरात झालेल्या या वाटमारीने एकच खळबळ उडाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)