शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

चार नगराध्यक्ष बिनविरोध

By admin | Updated: July 16, 2014 00:26 IST

केवळ एकच नामांकन दाखल झाल्याने जिल्ह्यात चार नगराध्यक्ष बिनविरोध झाले असून त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता शेष आहे. अन्य चार नगरपरिषदांसाठी १९ जुलै रोजी निवडणूक घेतली जाणार आहे.

घोषणेची औपचारिकता बाकी : यवतमाळ, घाटंजीत राष्ट्रवादीचे वर्चस्व यवतमाळ : केवळ एकच नामांकन दाखल झाल्याने जिल्ह्यात चार नगराध्यक्ष बिनविरोध झाले असून त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता शेष आहे. अन्य चार नगरपरिषदांसाठी १९ जुलै रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. यवतमाळ, घाटंजी, दिग्रस आणि वणी या नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्ष पदाचे एकच उमेदवारी अर्ज आल्याने बिनविरोध निवडले गेले. तर पुसद, उमरखेड, आर्णी, दारव्हा या नगरपरिषदांमध्ये एका पेक्षा अनेक अर्ज आल्याने १९ जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. यवतमाळमध्ये केवळ सहा सदस्यांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व स्थापन केले. येथे नगराध्यक्ष म्हणून सुभाष राय बिनविरोध निवडून आले. घाटंजीमध्ये राष्ट्रवादीच्या चंद्रलेखा रामटेके, दिग्रसमध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या सरिता धुर्वे तर वणीमध्ये सत्ताधारी आघाडीच्या अपक्ष उमेदवार करूणा कांबळे नगराध्यक्ष म्हणून अविरोध निवडून आल्या. वणीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र मनसेच्या प्रिया लभाणे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविला. त्या विरोधात अपिल केले जाणार आहे. अन्य चार नगरपरिषदांमध्ये सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी-काँग्रेसने जोरदार हालचाली चालविल्या आहे. पुसदमध्ये आतापर्यंत सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून काँग्रेसशी घरठाव केला आहे. यवतमाळ नगरपरिषदेत सातत्याने बदलणाऱ्या राजकीय स्थितीवर राष्ट्रवादीने यशस्वी मात केली. नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि बसपाच्या सदस्यांची शहर विकास आघाडी स्थापन आहे. या आघाडीत बिघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपाच्या गोटातून झाला. गेली अडीच वर्ष पक्ष विरोधी कारवाया करणारे आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ‘हात’ देणारे भाजपाचे नगराध्यक्ष योगेश गढिया व त्यांचे समर्थक नगरसेवक अचानक एकजुटीचे प्रदर्शन करीत एकत्र आले होते. या एकजुटीआड भाजपा नेत्याची कोंडी करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला होता. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. अखेर दोन दिवस चाललेल्या या घडामोडीतून मार्ग काढत राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष पदावरचा दावा कायम ठेवला. राष्ट्रवादीने आवश्यक संख्याबळ जुळविल्याने भाजपाची कोंडी झाली. नगराध्यक्षाची निवड प्रक्रिया १९ जुलै रोजी होणार असली तरी स्पर्धक उमेदवारच नसल्याने ही प्रक्रिया केवळ औपचारिकता ठरणार आहे. त्याच दिवशी नगर उपाध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यासाठी अनेकांची नावे चर्चेत असली तरी नेमका कोण बाजी मारतो, हे वेळच सांगणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)