शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

‘केम’ प्रकल्पात नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर द्या

By admin | Updated: July 15, 2016 00:31 IST

सामान्य जनता, शेतकरी व महिलांना समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाव्दारे (केम) जिल्ह्यात यशस्वी झाले आहे.

अमरावती : सामान्य जनता, शेतकरी व महिलांना समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाव्दारे (केम) जिल्ह्यात यशस्वी झाले आहे. अशा लघु उद्योग व ग्रामोद्योगांचा दाखला देऊन पारंपारिक शेती पीक उत्पादनासोबतच इतर शेतीपूरक जोडधंदे उभारण्यासाठी प्रोत्साहीत व प्रवृत्त करावे. त्यांची आर्थिक स्थिती सबळ करण्यासाठी रोजगारक्षम नाविण्यपूर्ण उपक्रमांवर भर देण्यात यावा, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गुरुवारी येथे केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी ‘केम’ प्रकल्पामार्फत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध विकासात्मक योजनांचा आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, समन्वयीत कृषि विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक गणेश चौधरी, माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी कुशल राठोड, केम प्रकल्पाचे अधिकारी सुर्वे, आंतरराष्ट्रीय कृषिविकास निधीचे अधिकारी, सर रतन टाटा ट्रस्टचे अधिकारी तसेच केम प्रकल्पांतर्गत चौदाही तालुक्याचे तालुका समन्वयक आदी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी सादरीकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील १४ तालुक्यात केमव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध विकासात्मक कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. ना. पोटे म्हणाले की, कृषी उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्नामध्ये योगदान देवून प्रकल्प क्षेत्रातील कुटुंबाचा, शाष्वत वैविध्यपूर्ण उत्पन्नाच्या स्त्रोतासह, कृषी व कृषित्तेर उत्पन्नाच्या साधनाव्दारे विकास करणे त्याचप्रमाणे उत्पादनातील व बाजपेठीय जोखीमींमुळे दारिद्र्य व नैराश्याच्या परिस्थितीत न जाता कुटुंबांना सुस्थितीत पुनर्स्थापित करणे हा केम प्रकल्प निर्माण करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पांमध्ये आंतरराष्ट्रीय कृषिविकास निधी व सर रतन टाटा ट्रस्ट यांच्याव्दारे संयुक्त पध्दतीने योजना राबाविण्यासाठी निधी दिला जातो. जिल्हयातील चौदा तालुक्यात विकासात्मक योजना राबविण्यासाठी १० क्लस्टरमध्ये सर रतन टाटा ट्रस्टमार्फत सुमारे ७५ कोटी रुपयांचा निधी केम प्रकल्पाला देण्यात आला आहे. यामध्ये जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून सिंचन सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टींग, शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाचे माकेर्टिंग, बचतगटाचे सबळीकरण, शेळीपालन, कुकुटपालन, ग्रामोद्योग व कुटीर उद्योग उभारणी, दालमिल-लघु उद्योग, शेती विषयक प्रशिक्षण आदी बाबींचा मुख्यत्वे समावेश आहे. शेतकऱ्यांची, बेरोजगार युवक तसेच महिलांनी केमव्दारे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ना. पोटे यांनी केले. कुठलेही अभियान राबविताना स्थानिक लोकप्रतिनिधींना सुध्दा सोबत ठेवावे. यामुळे नक्कीच लोक जुळेल व प्रकल्प यशस्वी होईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. केम प्रकल्पाद्वारे शेतकरी ग्रामस्थांना कसा न्याय मिळेल, याचे सुक्ष्म नियोजन करून रोजगारभिमुख उद्योगधंदे उभारण्याचे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. बैठकीला मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)