शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

मारेगावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धरणे

By admin | Updated: October 28, 2014 23:09 IST

निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाचे शेतकऱ्यांप्रती असलेले उदासीन धोरण, यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. बळीराजाला वाचविण्यासाठी शेतमालाला योग्य भाव द्यावा, यासाठी संभाजी

मारेगाव : निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाचे शेतकऱ्यांप्रती असलेले उदासीन धोरण, यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. बळीराजाला वाचविण्यासाठी शेतमालाला योग्य भाव द्यावा, यासाठी संभाजी ब्रिगेडतर्फे येथे २४ आॅक्टोबरला धरणे देऊन तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले.सध्या शेतकरी अस्मानी संकटात सापडले आहे़ निसर्गाच्या लहरीपणाने सोयाबीन हे नगदी पीक हातचे गेले आहे़ कापूस या दुसऱ्या नगदी पिकाचीही वाट लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीवर केलेला खर्चही निघणे अवघड आहे़ नगदी पिकांनीच धोका दिल्याने वर्षभर जगावे कसे आणि नवीन हंगामात शेती कशी उभारावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे़ त्यातच शेतमालाच्या किमतीबाबत शासनाचे उदासीन धोरण आहे़ सध्या शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन व कापूस आला आहे़ मात्र शासनाच्या नियंत्रणातील खरेदी बंद आहे़ त्याचा लाभ खासगी व्यापारी घेत असून जागतिक पातळीवर सोयाबीन व कापूस पिकांचे भाव गडगडल्याचे सांगून शेतकऱ्याकडील सोयाबीन व कापूस अल्प दरात खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहे़ शेतमालाच्या किमतीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडतर्फे मार्डी चौकात धरणे देण्यात आले़ आंदोलनात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी सहभागी झाले होते़ त्यानंतर येथील तहसीलदारामार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले़या निवेदनातून शासकीय खरेदी सुरू करावी, कापसाला सात हजार रूपये, सोयाबीनला पाच हजार रुपये प्रती क्विंटल भाव द्यावा, कमी दरात शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, कापूस निर्यात खुली करावी, बाहेर देशातून येणाऱ्या कापसावर आयात कर वाढवावा, शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या़ धरणे आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष रूद्रा पाटील कुचनकर, तालुकाध्यक्ष संतोष राजूरकर, अनंत मांडवकर, अनामिक बोढे, ज्योतीबा धोटे, प्रमोद लडके, राहुल घागी, प्रकाश कोल्हे, जयंत वानखेडे, रामदास आत्राम आदींसह तालुक्यातील शेतकरी सहभागी होते. (शहर प्रतिनिधी)