शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांपासून शालेय खिचडी उधारीवरच !

By admin | Updated: August 31, 2016 02:08 IST

एकीकडे पोषण आहाराची माहिती आॅनलाईन मागायची अन् दुसरीकडे आहाराचे अनुदान मात्र अडकवून

अनुदान अडले : स्वतंत्र कक्ष आणि स्वतंत्र अधीक्षक कुचकामी यवतमाळ : एकीकडे पोषण आहाराची माहिती आॅनलाईन मागायची अन् दुसरीकडे आहाराचे अनुदान मात्र अडकवून ठेवायचे, असा उलटा कारभार सध्या शिक्षण विभागात सुरू आहे. जिल्ह्यातील शाळांना तब्बल पाच महिन्यांपासून पोषण आहाराचे अनुदानच देण्यात आलेले नाही. त्यामुळे मुख्याध्यापक-शिक्षक यांना गावातल्या दुकानदारांकडून उधारीवर साहित्य खरेदी करून विद्यार्थ्यांना आहार द्यावा लागत आहे. यावर्षी शालेय पोषण आहाराची दैनंदिन माहिती आॅनलाईन भरण्याची सक्ती शिक्षण विभागाने केली आहे. रोजच्या रोज ही माहिती भरताना आधीच शिक्षकांची तारांबळ उडत आहे. कधी नेटवर्क नसणे, तर कुठे संगणकासारखे साहित्यच उपलब्ध नसणे, मोबाईल अ‍ॅपवर माहिती भरल्यास चुकीची माहिती येणे अशा विविध अडचणी भेडसावत असतानाही शिक्षकांनी पोषण आहार योजना विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी टिकवून ठेवली आहे. दैनंदिन माहिती आॅनलाईन न भरल्यास अनुदान देण्यात येणार नाही, अशी तंबीही शाळांना देण्यात आली आहे. मात्र, पोषण आहाराचे अनुदान देण्याबाबत प्रचंड दुर्लक्ष केले जात आहे. जिल्ह्यातील शाळांना एप्रिल, मे, जून, जुलै आणि आॅगस्ट या चालू महिन्याचे अनुदानच मिळालेले नाही. शासनाकडून अनुदान आले नाही, तरी पोषण आहार मात्र रोज देण्याची सक्ती आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना गावातल्या दुकानदारांकडून उधारीवर धान्य व इतर साहित्य आणावे लागत आहे. शिवाय, पोषण आहार शिजविणारा स्वयंपाकी, मदतनिस यांना दिले जाणारे १ हजाराचे तुटपुंजे मासिक मानधनही देण्यात आलेले नाही. पाच महिन्यापासून मानधन नसल्याने स्वयंपाकी आणि मदतनिस त्रस्त झाले आहे. ते आपली व्यथा शासनाकडे मांडू शकत नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांनाच त्यांची समस्या ऐकून घ्यावी लागते. काही शाळांतील स्वयंपाक्यांनी तर पोळ्यापासून आपण कामच करणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तातडीने अनुदान व मानधनाचे पैसे देण्याची गरज आहे. शालेय पोषण आहाराचा कारभार पाहण्यासाठी शिक्षण विभागाकडे स्वतंत्र यंत्रणा आहे. जिल्हा स्तरावर एक अधीक्षक आणि प्रत्येक पंचायत समिती स्तरावरही पोषण आहार अधीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, आहार पुरवठा किंंवा अनुदान वाटपात नेहमीच हयगय होताना दिसते. असे असताना पुरवठादार किंवा कंत्राटदारावर आजवर कधीच कारवाई झालेली नाही. केवळ मुख्याध्यापक-शिक्षकांनाच आहार पुरवण्याची जबाबदारी देऊन शिक्षण विभाग मोकळा झाल्याचे दिसते. शिवाय, अशा उधारीवरच्या आहाराचीही माहिती रोजच्या रोज आॅनलाईन द्यावी लागत असल्याने मोठ्या प्रमाणात ओरड होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)