शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगराध्यक्षांसह कुटुंबातील पाच जखमी

By admin | Updated: November 15, 2015 01:42 IST

माजी नगराध्यक्ष राजूभैया ऊर्फ चंद्रशेखर जयस्वाल यांच्या वाहनाला अपघात होऊन त्यांच्यासह परिवारातील पाच जण गंभीररित्या जखमी झाले.

झाडाला धडक : कळमनुरीजवळ जयस्वाल परिवारावर आघातउमरखेड : माजी नगराध्यक्ष राजूभैया ऊर्फ चंद्रशेखर जयस्वाल यांच्या वाहनाला अपघात होऊन त्यांच्यासह परिवारातील पाच जण गंभीररित्या जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री ११ वाजता कळमनुरी-शेंबाळपिंपरी रोडवर बाभळी गावाजवळ झाला. जखमींना नागपूर येथे हलविण्यात आले आहे. या अपघातात माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल (५५), त्यांच्या पत्नी सुरेखा जयस्वाल (५०), मुलगा मिथिलेश जयस्वाल (२५), सून पूनम जयस्वाल (२३), शिवाणी जयस्वाल (२) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहे. या सर्वांच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीररीत्या मार लागला आहे. उमरखेड येथील जयस्वाल परिवार शुक्रवारी काही कामानिमित्त दुपारीच हिंगोली येथे गेला होता. काम आटोपून रात्री ते आपल्या गाडीने (एम.एच.२९/४५६) उमरखेडकडे परत निघाले होते. दरम्यान, कळमनुरी ते शेंबाळपिंपरी मार्गावर बाभळी फाट्याजवळ रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात गाडीवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित गाडी रस्त्यालगतच्या झाडावर धडकली. यावेळी मिथीलेश जयस्वाल हे गाडी चालवित होते. जबर धडक बसल्यामुळे गाडीतील पाचही जण गाडीबाहेर फेकल्या गेले. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. रात्री ११ वाजताची वेळ असल्यामुळे रस्ता सुनसान होता. मदतीसाठीही कोणीच नव्हते. अचानक शेंबाळपिंपरी येथील नीलेश नवलचंद सोनी यांच्या मालकीची गाडी घेऊन शेख शकील शेख करीम (३०) रा.इसापूर धरण हा युवक त्याच रस्त्याने आला. रात्रीची वेळ असूनही अपघात झाल्याचे दिसताच त्याने गाडी थांबवून विचारपूस केली. जखमी उमरखेडचे जयस्वाल असल्याचे कळताच त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या इतर एक-दोन वाहनांना थांबविले व जखमींना शेंबाळपिंपरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. परंतु त्यावेळी आरोग्य केंद्रात कोणताही डॉक्टर किंवा कर्मचारी हजर नव्हता. शेवटी रुग्णवाहिकेवरील डॉ.बांधे आणि खासगी डॉ.मदन चंदेल यांनी प्राथमिक उपचार केला. परंतु गंभीर मार लागलेला असल्यामुळे सर्व जखमींना तातडीने पुसदवरून नागपूरला हलविण्यात आले. नागपूर येथे उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. (शहर प्रतिनिधी)