शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पाच मुलांनी अव्हेरले; शेवटी मजुरी करणाऱ्या मुलीने जपले

By admin | Updated: July 19, 2016 02:35 IST

सहन करीत राहणे, हा उतारवयाला मिळालेला अभिशाप असतो का? कमावत्या मुलांनी पोसायला नकार दिला तरी त्यांच्याविषयी

आजारी वृद्धांना भावनिक यातना : डॉक्टरांच्या संपाने उपाशी रुग्णांचा उघड्यावर मुक्काम, गरीब रुग्ण म्हणतात, ‘पोटाले खाव का दुखण्याले लावाव’अविनाश साबापुरे ल्ल यवतमाळ सहन करीत राहणे, हा उतारवयाला मिळालेला अभिशाप असतो का? कमावत्या मुलांनी पोसायला नकार दिला तरी त्यांच्याविषयी प्रेमाचीच बरसात करीत राहायचे, ही माया म्हातारे आईवडील कुठून शिकतात? हाडाचे काडं करून पोरांना मोठे केले. पण त्याच पोरांनी म्हाताऱ्यांचा अव्हेर केला. हे वृद्ध मरणपंथाला लागले तरी, पोरं यायला तयार नाही. शेवटी रोजमजुरी करणाऱ्या मुलीनेच त्यांना दवाखान्याचे दर्शन घडविले. त्यातही सोमवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप असल्याने पोटच्या पोरांप्रमाणे डॉक्टर पोरांचाही जाच सहन करावा लागला.पुसद तालुक्यातून आलेल्या गोकर्णा मारघने आणि दत्ता साखरकर या सत्तरीतल्या वृद्धांची ही कहाणी आहे. मोहदी गावात राहणाऱ्या या दोघांनाही मोतीबिंदू. दृष्टी अधू. शरीरात इतरही आजारांचे ठाण. पण निदान डोळे सुधारावे म्हणजे मजुरी करता येईल, एवढीच धडपड. पण जिथे जेवणाचीच सोय नाही, तिथे त्यांना दवाखान्यात नेणार कोण? ‘पोटाले खाव का दुखण्याले लावाव’ हा प्रश्न विचारणाऱ्या गोकर्णाबाई पोटच्या गोळ्यांची आठवण काढून रडतात.गोकर्णाबाईला दोन मुलं आहेत. तरुण्यात पाऊल ठेवताच दोघेही मुंबईला भुर्र उडून गेले. गेले ते गावाकडे कधी आलेच नाही. म्हाताऱ्या आईला साधा फोनही केला नाही. हातपाय चालायचे तोवर गोकर्णाबाई मजुरी करून जगली. आता हातपाय काम करेना. डोळेही गेले. गावातले शेजारी सध्या तिला जगवित आहेत. त्याच गावातले दत्ता साखरकर यांची कहाणी तर अधिकच विदारक. त्यांना पाच मुले आणि एक मुलगी. घरी पाच एकर वावर होते. वय झाल्यावर त्यांनी पाचही मुलांना एक-एक एकर वाटून दिले. तेव्हापासून मुलांनी पुन्हा बापाकडे ढुंकूनही पाहिले नाही. मुलांच्या मानसिक दुराव्याने गोकर्णाबाई आणि दत्ता हे दोन्ही वृद्ध जीव दुखावले आहेत. पण सांगायचे कुणाला?या दोघांनाही मोतीबिंदू झाला. गेल्या काही महिन्यांपासून ते पुसदच्या सरकारी दवाखान्यात चकरा मारून थकले. पण जुजबी उपचारापलिकडे उपजिल्हा रुग्णालयात फारसे काय होणार? यवतमाळच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात जाण्याचा सल्ला मिळाला. पण नेणार कोण? पैसे कुठून येणार? प्रश्नच प्रश्न होते. मुलांनी अव्हेरलेल्या या म्हाताऱ्या जीवांसाठी शेवटी मुलगीच सरसावली. तिचे नाव बेबी. दत्ता साखरकर यांची ही विधवा मुलगीही दोन वेळच्या जेवणासाठी संघर्षच करते. मजुरी केल्याविना तिलाही पर्याय नाही. पण वडीलांच्या आजारासाठी तिने मजुरीचे पैसे गोळा केले. दत्ता साखरकर यांना मुलीने हात दिला. पण गोकर्णाचे काय? म्हणून मग बेबीनेच तिचाही उपचार करायचे ठरविले. सोमवारी सकाळीच बेबीने दोघांनाही एसटीने यवतमाळात आणले. पण नशिबाचा फेरा बघा. रुग्णालयात आल्यावर त्यांना सांगण्यात आले, उद्या १२ वाजता या! प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा आज संप असल्याचे या खेडूत वृद्धांना कसे कळणार? डॉक्टरची वाट पाहायची म्हणून ते तिघेही रुग्णालयाच्या परिसरातच थांबले. घरून आणलेली लसणाची चटणी आणि भाकर सोडली. चार घास पोटात लोटले अन् पाणी पिऊन तिथेच पहुडले रात्रभर.चार गोष्टी प्रेमाच्या... बाकी काय पाह्यजे?४पोटच्या पोरांनी अव्हेर केल्याचे दु:ख घेऊन प्रवासाला निघालेल्या गोकर्णा आणि दत्ता या वृद्धांना यवतमाळात माणुसकीचा प्रत्यय आला. पुसदहून येताना दारव्हा बसस्थानकावर त्यांच्या एसटीत संतोष ढोके हा तरुण बसला. प्रवासात त्याने या वृद्धांची वास्तपूस्त केली. त्यांची हकीगत ऐकून त्याचेही काळीज द्रवले. यवतमाळात उतरल्यावर तो या वृद्धांसोबत दवाखान्यापर्यंत आला. उद्या मी पुन्हा येईल, हा माझा नंबर ठेवा, काही लागले तर फोन करा, असे सांगून गेला. तो निघून गेल्यावर हळवे वृद्ध म्हणाले, ‘कुठचा कोण बापा हा! पण चार गोष्टी बोलला, तेव्हढीच माया. बाकी आमाले काय पाह्यजे?’