शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ पालिकेचा १२०० घरकुलांचा पहिला प्रकल्प

By admin | Updated: January 20, 2017 03:00 IST

नगरपरिषद क्षेत्रात बेघरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूल बांधण्याचा आराखडा तयार केला जात

बेघरांची होणार सोय : वाढीव क्षेत्रातील सात भूखंडांचा प्रस्ताव सुरेंद्र राऊत   यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात बेघरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूल बांधण्याचा आराखडा तयार केला जात असून नागपूर मार्गावरच्या तायडे नगरातील १० एकर जागेत १२०० घरकुलांचा पहिला प्रोजेक्ट साकारण्यात येणार आहे. तसेच वाढीव क्षेत्रातील सात शासकीय भूखंड मिळविण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूल बांधकामासाठी निधीची मर्यादा नसल्याने पालिकेकडून तयार करण्यात आलेल्या घरकूल आराखड्यानुसार मागेल तितका निधी केंद्र सरकारकडून मिळणार आहे. यात ज्यांच्याकडे मालकीची जागा आहे व ज्यांकडे जागा नाही अशा दोन्ही लाभार्थ्यांची यादी तयार केली जात आहे. तीन लाख रूपये उत्पन्न मर्यादा आणि स्वत:चे घर नसल्याचा पुरावा अथवा भाडे कराराची प्रत देऊन या घरकुलाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी दवे असोसिएट्सकडून लाभार्थ्यांची नोंद घेण्याचे काम सुरू आहे. विहित नमुन्यातील अर्जावरून ही आॅनलाईन यादी तयार केली जात आहे. आतापर्यंत शहरातील विविध भागातून घरकुलासाठी ८ हजार ५०० अर्ज प्राप्त झाले आहेत. सध्याही अर्ज नोंदणी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील घरकूल योजनेचा आराखडा तयार केला जात आहे. यासाठी नगरपरिषदेने नागपूर मार्गावर तायडेनगर परिसरातील १० एकर भुखंडावर १२०० घरकूल प्रस्तावित केले आहे. पालिका क्षेत्रात समाविष्ठ झालेल्या भागातही शासकीय भूखंड आहेत. त्या जागा मिळविण्यासाठी पालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. यात वडगाव येथे दोन भूखंड, पिंपळगावमध्ये तीन भूखंड, मोहा, लोहारा येथील प्रत्येक एक शासकीय भूखंड घरकूल योजनेसाठी मागण्यात येणार आहे. केंद्राकडून विकास आराखड्यानुसार निधी दिला जात असल्याने लाभार्थी निवड व घरकुलांची संख्या या दोन्हीसह प्रस्ताव शासनाकडे दिला जाणार आहे. घरकुलासाठी लाभार्थ्यांकडून नगरपरिषदेत मोठ्याप्रमाणात अर्ज नोंदणी केली जात आहे. तीन ते सहा लाख उत्पन्न असलेल्यांना गृह कर्जाच्या व्याजदारात सवलत दिली जाणार आहे. स्वत:च्या मालकी ३७० चौरस फुट क्षेत्र असणे बंधनकारक आहे. अशा लाभार्थ्यांना घरकूलसाठी अडीच लाखापर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार आहे.