शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच आखाडीला सासर गेले, माहेर गेले अन् तीही गेली !

By admin | Updated: April 28, 2017 02:26 IST

लग्नानंतरची पहिली आखाडी आली म्हणून तिचा भाऊ तिला घ्यायला आला. माहेराच्या ओढीने ती भावासोबत निघाली,

उष्माघात : मोहदाच्या नवविवाहितेचा गवंडी येथे मृत्यू यवतमाळ : लग्नानंतरची पहिली आखाडी आली म्हणून तिचा भाऊ तिला घ्यायला आला. माहेराच्या ओढीने ती भावासोबत निघाली, पण जीवघेण्या तापमानाने खरोखरच तिचा जीव घेतला. बाभूळगाव तालुक्यातील गवंडी येथील बसस्टॉपवर तिला भोवळ आली अन् जागीच मृत्यू झाला. रंजना गणेश पाचखेडे (२०) असे या मृत नवविवाहितेचे नाव आहे. पांढरकवडा तालुक्यातील मोहदा हे तिचे माहेर. आईवडिलांनी लाडात वाढविलेल्या रंजनाचे अवघ्या ९ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. १९ एप्रिल रोजी बाभूळगाव तालुक्यातील गवंडी येथील गणेश पाचखडेसोबत ती विवाहबद्ध झाली. मोहदा येथील शेतकरी सूर्यभान नानोटे यांनी अत्यंत आनंदात आपल्या लेकीचे हात पिवळे केले. पण अवघ्या आठवडाभरातच त्यांच्या आनंदावर काळाची वक्रदृष्टी पडली. शुक्रवारी आलेली अक्षयतृतिया म्हणजेच रंजनाची लग्नानंतरची पहिली आखाडी होती. आपल्या बहिणीला माहेरी आणायचे म्हणून भाऊ विजय नानोटे मोठ्या आनंदाने रंजनाच्या सासरी गवंडी येथे गेला होता. तेथून बहिण भाऊ मोहद्याला यायला निघाले. मात्र गवंडी बसथांब्यावर आॅटोरिक्षातून उतरताच रंजनाला अचानक चक्कर आली. भर उन्हात ती खाली पडली. तिला तातडीने बाभूळगावच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथून यवतमाळच्या जिल्हा रूग्णालयात अतिदक्षता कक्षात भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रंजनाचा मृत्यू झाला. उष्माघातामुळे रंजनाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज मेडिकलमधील डॉक्टरांनी व्यक्त केला. दहावीपर्यंत शिकलेल्या रंजनाचे वडील आणि पतीही शेतकरी आहेत. रंजनाच्या हातावरची मेहंदी वाळण्यापूर्वीच तिचा मृत्यू पाहण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली असून संपूर्ण मोहदा गाव शोकमग्न झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)