शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
3
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
4
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
5
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
6
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
7
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
8
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
9
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
10
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
11
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
12
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
13
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
14
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
15
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
16
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
17
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
18
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
19
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
20
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!

बळीराजाची आर्थिक जुळवाजुळव

By admin | Updated: June 4, 2014 00:22 IST

यावर्षी अतवृष्टी आणि नंतर गारपिटीने खरीप व रबी हंगामात मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन केल्यानंतर पुन्हा एकदा शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. त्यासाठी तो पैशाची जुळवाजुळव करीत आहे.

नजरा पीक विम्याकडे : बँकांनी दाखविली पाठ, सावकारीचा धंदा तेजीतयवतमाळ : यावर्षी अतवृष्टी आणि नंतर गारपिटीने खरीप व रबी हंगामात मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन केल्यानंतर पुन्हा एकदा शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. त्यासाठी तो पैशाची जुळवाजुळव करीत आहे. बँकांकडून वेळेवर पैसे मिळेनासे झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सावकारीचा धंदा तेजीत आल्याचे ग्रामीण भागात दिसून येते. शेतकरी मृग नक्षत्रात पेरणी करुन उत्पन्नाची वाट पाहत असतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून याला अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने शेतकर्‍यांजवळ एक पैसाही शिल्लक राहत नाही. परिणामी शेतकर्‍यांची खरीप हंगामाच्या तोंडावर पैशासाठी धावपळ सुरू होते. सध्या जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करीत असून याचा फायदा सावकार घेत आहेत. शासन शेतकर्‍यांच्या उत्थानासाठी विविध योजना राबवितात. परंतु शासकीय योजना शेतकर्‍यांपेक्षा व्यापार्‍यांच्या हिताच्या असल्याचे दिसून येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही कापसाच्या व इतर पिकांच्या निर्याती संदर्भात शासनाचे धोरण शेतकर्‍यांसाठी मारक ठरल्याचे दिसत आहे. उपविभागात सिंचन क्षेत्र कमी असून ते वाढविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना कोरडवाहू शेतीवरच आपला उदरनिर्वाह करावा लागतो. बेभरवशाचा पाऊस व मजुरांचे वाढते दर यामुळे परिसरातील शेतकरी तुर्तास गांजला आहे. सोयाबीन पिकानेही हवी तशी साथ न दिल्याने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांचीही कारखान्यांकडून फसवणूक होत असल्याने ते आर्थिक कोंडीत सापडल्याचे चित्र आहे. सध्य स्थितीत शेतमालाचे बाजारमूल्य घसरल्याने शेतकरी आर्थिक डबघाईस आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आता शासनाच्या पीक कर्जाकडे  वळल्या आहेत. काही बॅंकांनी कर्ज वाटपास प्रारंभ केला आहे. मात्र शेतकर्‍यांना या बॅंकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. सातबारा व इतर कागदपत्रे मिळविण्यासाठी शेतकरी उन्हातान्हात फिरत असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत शेतकर्‍यांजवळ पैसेच नाही. खरीप पूर्व मशागतीच्या कामाला प्रारंभ झाला. पूर्वी घरच्या बैलाद्वारे नांगरटी केली जायची. मात्र आता बैल परवडत नसल्याने शेतकरी ट्रॅक्टरचा आधार घेत आहेत. त्यासाठी रोख पैसे मोजावे लागत आहे. तसेच ऐनवेळी बी-बियाण्यांची टंचाई होऊ शकते. त्यामुळे अनेक शेतकरी बियाण्यांची खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र पैसा नसल्याने बियाणे उधारीत घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा स्थितीत शेतकरी सावकाराच्या दारात जात आहेत. अव्वाच्या सव्वा व्याज आकारून शेतकर्‍यांची लुबाडणूक होण्याची शक्यता आहे. एकंदरीत शेतकरी हंगामाच्या सुरुवातीपासूनच आर्थिक जुळवाजुळव करीत आहे. परंतु प्रत्येकालाच यामध्ये यश येताना दिसत नाही. (प्रतिनिधी)