शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
7
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
8
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
9
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
10
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
11
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
12
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
13
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
14
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
15
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
16
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
17
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
18
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
19
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
20
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...

अखेर जिल्हा बँकेचे पीक कर्जवाटप पुन्हा सुरू

By admin | Updated: May 24, 2016 00:02 IST

सुमारे २० दिवसांपासून निधी अभावी बंद पडलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पीक कर्ज वाटप अखेर पुन्हा सुरू झाले आहे.

शेतकऱ्यांना दिलासा : स्वनिधीतून ५० कोटींची तरतूद यवतमाळ : सुमारे २० दिवसांपासून निधी अभावी बंद पडलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पीक कर्ज वाटप अखेर पुन्हा सुरू झाले आहे. राज्य बँकेने पीक कर्जासाठी जिल्हा बँकेला ‘वेटींग’वर ठेवल्याने अखेर जिल्हा बँकेने स्वनिधीतून ५० कोटी रुपयांची तरतूद करीत पीक कर्ज वाटपातील हा तिढा तूर्त सोडविला. जिल्हा बँकेच्या सर्व ९१ शाखांना पीक कर्ज वाटप सुरू करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार सोमवारपासून या वाटपाला प्रारंभही झाला. ४५६ कोटींचे उद्दीष्ट असलेल्या जिल्हा बँकेने १३० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. मात्र पैसा संपल्याने शुक्रवार ६ मेपासून हे पीक कर्ज वाटप बंद पडले होते. जिल्हा बँकेने राज्य बँकेला ३०३ कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली. मात्र या मागणीवरून दीड ते दोन महिने लोटत असूनही राज्य बँकेने कर्ज मंजूर केलेले नाही. पर्यायाने जिल्हा बँकेची कोंडी झाली आहे. ऐन हंगाम तोंडावर आला असताना गेल्या २० दिवसांपासून जिल्हा बँकेचे पीक कर्ज वाटप बंद असल्याने हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. चहूबाजूने शेतकऱ्यांकडून बँकेच्या कारभारावर टीका केली जात होती. शेतकऱ्यांप्रमाणेच कर्जाअभावी जिल्हा बँकही आर्थिक कोंडीत सापडली होती. वारंवार संपर्क करूनही राज्य बँकेकडून कर्ज मंजुरीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर आर्थिक कोंडी फोडण्यासाठी जिल्हा बँकेने स्वनिधीतून ५० कोटी रुपये तातडीने पीक कर्ज वाटपासाठी वळविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाची लगेच अंमलबजावणीही सुरू झाली. सर्व ९१ शाखांना पीक कर्ज वाटपाचे आदेश देण्यात आले. मंगळवारपासून बँकेच्या सर्व शाखांमध्ये पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी उसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नाबार्डने राज्य बँकेला अद्यापही कर्ज मंजूर केले नाही, पर्यायाने राज्य बँकेने जिल्हा बँकेसाठी हात सैल केला नाही. शिखर बँकेकडून कर्ज मंजूर होण्यास आणखी आठवडा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांची बी-बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू आहे. परंतु पीक कर्जच नसल्यामुळे हातावर हात देऊन बसण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नव्हता. बँकेने स्वनिधीतून आर्थिक तरतूद केली नसती तर शेतकऱ्यांवर सावकाराच्या दारीच जाण्याची वेळ होती. मात्र आता शेतकऱ्यांना हक्काच्या जिल्हा बँकेतूनच पीक कर्ज मिळणार आहे. तातडीने १०० कोटी द्या हो...! जिल्हा बँकेने राज्य बँकेला ३०३ कोटींच्या कर्जाची मागणी केली असली तरी त्यातून २३० कोटींच्या आसपास कर्ज मंजूर होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीही एवढेच कर्ज मंजूर झाले होते. २३० कोटी मोठी रक्कम असल्याने ती मंजूर होण्यास एक आठवडापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता पाहता जिल्हा बँकेने राज्य बँकेला ‘तातडीने किमान १०० कोटी तरी द्या हो’ अशा शब्दात विनवणी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी) सत्ताधारी, विरोधकांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले २० दिवसांपासून जिल्हा बँकेचे पीक कर्ज वाटप बंद आहे. शेतकरी कर्जासाठी बँकेत येरझारा मारतो आहे. मात्र त्याची ही व्यथा सत्ताधारी भाजपा-शिवसेना पक्षाचे लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकाऱ्यांनी जाणली नाही. विरोधी पक्ष म्हणून जाब विचारण्याचा अधिकार असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेते-पदाधिकाऱ्यांनाही शेतकऱ्यांचे हे दु:ख जणू दिसले नाही. पीक कर्ज वाटप बंद का म्हणून विरोधी पक्षाच्या कोणत्याही माजी आमदाराने प्रशासनाला जाब विचारलेला नाही. ज्या शेतकरी मतदारांनी निवडून दिले, त्यांच्या या व्यथेवर शिवसेना-भाजपाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे, प्रशासनाला धारेवर धरल्याचे ऐकिवात नाही. एकूणच आधीच दुष्काळात फसलेल्या या शेतकऱ्यांना सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अक्षरश: वाऱ्यावर सोडल्याचे विदारक चित्र पहायला मिळाले. शेतकऱ्यांची पीक कर्जाची मागणी लक्षात घेता जिल्हा बँकेने स्वनिधीतून ५० कोटी रुपयांची तातडीचे तरतूद केली आहे. यातून जिल्हा भर पीक कर्ज वाटप सुरू झाले आहे. राज्य बँकेकडून दोन-तीन दिवसात १०० कोटींचे कर्ज मिळण्याची आशा आहे. एकूण ३०३ कोटींच्या कर्जाची मागणी नोंदविली गेली आहे. - अविनाश सिंघममुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँक, यवतमाळ