शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन भूखंड अर्र्जही टप्प्याटप्प्याने

By admin | Updated: March 6, 2017 01:18 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वतीने आता नवीन भुखंडासाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

एमआयडीसी : विकसितशिवाय प्रक्रिया नाहीयवतमाळ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वतीने आता नवीन भुखंडासाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी जिल्ह्यात सध्या नवीन भुखंडासाठी अर्ज स्वीकारणे बंद आहे. संपूर्ण विकसित भूखंड उपलब्ध नसल्याने ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होत आहे.एमआयडीसीमधील भूखंड वितरणाची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन करण्यात आली आहे. परंतु वर्षभर आॅनलार्र्ईन अर्ज स्वीकारण्याची लिंक सुरू न ठेवता, ज्या एमआयडीसीमध्ये भूखंड वितरणासाठी उपलब्ध आहे, त्याची आगाऊ सूचना देऊन काही दिवसांसाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारले जातात आणि पुन्हा लिंक बंद करण्यात येते. अशाप्रकारे जिल्ह्यातील विविध एमआयडीसी साठी टप्प्याटप्प्याने भूखंड वाटपाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पुसद येथील ७० ते ८० व दिग्रस येथील दोन भूखंडासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. १ मार्चपर्यंत यासाठी लिंक सुरू होती. परंतु त्यानंतर ती बंद करण्यात आली. आता आलेल्या अर्जांवर विचार करून भूखंड वितरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर इतर एमआयडीसीमध्ये भूखंड उपलब्ध असल्यास त्यासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील. जिल्ह्यातील काही एमआयडीसींमध्ये भूखंड शिल्लक असले तरी ते विकसित नसल्याने त्यांचे वितरण करण्यात येत नाही. ज्या एमआयडीसींमध्ये रस्ते, वीज व पाणी अशा सर्व सोयी भूखंडापर्यंत पोहचल्या आहेत, तेच भूखंड वितरीत करण्याचे एमआयडीसीचे धोरण आहे. येत्या काळात कळंब, घाटंजी व दारव्हा येथील भूखंडांसाठी लिलाव पद्धती राबविली जाण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने नवीन भूखंड घेऊन नव्याने उद्योग सुरू करणाऱ्या किंवा आहे तो उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्नात असलेल्या उद्योजकांनी तयार असणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)