शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीत शेतकºयांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:47 IST

शासनाकडून कर्जमाफी ची घोषणा झाली परंतु शेतकºयांची परवड मात्र थांबलेली नाही. कर्जमाफीचा अर्ज आॅनलाईन भरावयाचा असल्याने शेतकºयाला हा अर्ज भरण्यासाठी सेतूसमोर तासन्तास उभे राहावे लागत आहे.

ठळक मुद्देवारंवार लिंक फेल : कर्जमाफीचा अर्ज भरताना बेहाल

हरिओम बघेल।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : शासनाकडून कर्जमाफी ची घोषणा झाली परंतु शेतकºयांची परवड मात्र थांबलेली नाही. कर्जमाफीचा अर्ज आॅनलाईन भरावयाचा असल्याने शेतकºयाला हा अर्ज भरण्यासाठी सेतूसमोर तासन्तास उभे राहावे लागत आहे. लिंक वारंवार फेल होत आहे. एक अर्ज भरायला चार ते पाच तास वाट पाहावी लागत आहे. सोबतच सेतु सुविधा केंद्राकडून शंभर रुपयेसुद्धा घेण्यात येत असल्याचे पुढे आले आहे.कर्जमाफीच्या फॉर्म भरण्याच्या किचकट प्रक्रियेमुळे शेतकरी बेहाल झाला आहे. यासाठी शासनाकडून ग्रामपंचायत स्तरावर फॉर्म भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्याचे म्हटले आहे. परंतु वास्तव मात्र वेगळे आहे. अनेक ग्रामपंचायत कार्यालयात विद्यतु पुरवठा योग्यरित्या व सुरळीत होत नाही. नेटचे कनेक्शन नाही, अशा वेगवेगळ्या व विविध समस्या आहेत. काही ग्रामपंचायतमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहे, परंतु सर्व्हर डाऊन होत आहे. यामुळे गावातसुद्धा अनेक अडचणींचा सामना शेतकरी वर्गाला करावा लागत आहे.१५ सप्टेंबरपर्यंत ही मुदत दिली आहे. त्यामुळे आता येत्या दिवसात ही बेबसाईड बिझी राहिल व यात शेतकरी वर्गाला अडचणींचा सामना करावा लागेल, हे निश्चित. यामध्ये वयोवृद्ध, महिला शेतकरी वर्गाचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी दूरवरून नागरिक शहराच्या ठिकाणी दाखल होत आहे.