शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पोळ््याच्या झडत्यांना प्रबोधनाची झालर

By admin | Updated: September 2, 2016 02:33 IST

पोळा आणि झडत्या यांच अतुट नातं. ग्रामीण कृषी संस्कृतिशी ऋणानुबंध सांगणाऱ्या पोळ््याला झडत्या म्हणण्याची परंपरा आहे.

पोळा उत्साहात : एक नमन कौडा पार्वती हर हर महादेवप्रकाश सातघरे दिग्रसपोळा आणि झडत्या यांच अतुट नातं. ग्रामीण कृषी संस्कृतिशी ऋणानुबंध सांगणाऱ्या पोळ््याला झडत्या म्हणण्याची परंपरा आहे. दिग्रस येथे गुरूवारी साजरा झालेल्या पोळ््याच्या झडत्यांना यंदा प्रबोधनाची झुल चढविली होती. एक नमन कौडा पार्वती हर हर बोलाच्या गजरात प्रबोधनाच्या झडत्या झडल्या. विदर्भातील ग्रामीण भागातील पोळा हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. यावर्षी पिकांची स्थिती समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते. परंतु गत काही दिवसांपासून तोरणाखालील बैलांची संख्या मात्र घटत आहे. परंतु ज्याच्या दारात बैल आहे तो पोळ््याच्या दिवशी आपल्या सर्जा-राजाला सजविल्याशिवाय राहात नाही. श्रावणाच्या शेवटच्या दिवशी तो बैलाला सजवून तोरणाखाली आणतो. यंदा तर तालुक्यात दोन दिवस पोळा साजरा करण्यात आला. मात्र दिग्रस शहरातील शिवाजी मैदानावर गुरूवारीच पोळा भरविण्यात आला. या पोळ््यात विविध झडत्या झडल्या त्यात ‘सरपंच रे सरपंच आमच्या गावचा सरपंच, सरकारी योजनांच्या भरवशावर भागवतो आपल्या घरचा प्रपंच’ अशी झडती देण्यात आली. तसेच जनजागृतीपर झडत्याही देण्यात आल्या. गुटखा, रक्तदान यावरही झडत्या म्हणण्यात आल्या. यासोबतच पोळ््यातील प्रसिद्ध झडती ‘गणा रे गणा, गण गेला वरच्या राणा, वरच्या राणातून आणला गवताचा भारा तो टाकला हो पार्वती हारा, पार्वतीने दिली हस्ती ते हस्ती पाहून माझा बैल आला मस्ती आता तो खेळतो कुस्ती, एक नमन कौडा पार्वती हर हर बोला.’ कोणत्याही रुढी, परंपरा आणि वाईट गोष्टींना फाटा देण्यासाठी सण, उत्सवांचा उपयोग कसा करता येतो याचे उदाहरण म्हणजे पोळा हा सण होय. दिग्रस शहरात आज सर्वत्र उत्साहात पोळ्याचा सण साजरा करण्यात आला.