शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

फौजदार, दोन पोलीस कर्मचारी निलंबित

By admin | Updated: June 26, 2014 00:01 IST

स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दालनात पाचारण करून जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. एक फौजदार

यवतमाळ : स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दालनात पाचारण करून जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. एक फौजदार आणि दोन पोलीस शिपायांना तत्काळ दालनातून बाहेर काढून निलंबनाची तंबीही दिली. सायंकाळी एका आदेशान्वये या तिघांना निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलीस दलात आव्हानात्मक गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिनस्थ एकूण सहा पथक आहेत. या पथकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमालीची अनागोंदी वाढली आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रणच राहिले नाही. त्यामुळे गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेकदा सूचना देऊनही या घटना नियंत्रित झाल्या नाही. शिवाय अनेक महत्त्वाचे तपासही रखडले आहेत. ही बाब लक्षात येताच जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी २५ जूनला सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे, महेश तोगरवाड, फौजदार आर.डी. वाटाणे, सुगत पुंडगे, वाणी यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांना पेशीत बोलावले. या वेळी पसार आरोपींच्या अटकेवरून, घरफोडी, जबरी चोऱ्या यांचे नियंत्रण आणि गुन्हेगारांशी असलेल्या संबंधावरून अनेकांची कानउघाडणी करण्यात आली. तत्पूर्वी ताब्यातील आरोपी पसार झाल्याच्या कारणावरून एका फौजदाराला एसपी शर्मा यांनी चांगलेच झाडले. त्यानंतर दोन पोलीस शिपायांना एका गंभीर घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना न पुरविता दडपल्याने त्यांनाही चांगलेच झापले. तसेच फौजदारासह त्या शिपायांनाही तत्काळ दालनाबाहेर जाण्यास सांगून निलंबित करण्याची तंबी दिली. तसेच सायंकाळी त्यांना एका आदेशान्वये निलंबितही केले. त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयातील वातावरण दिवसभर तापून होते. एसपी शर्मा यांनी विशेष पथकांमध्ये काही फेरबदल केले. या पथकातील कर्मचारी त्या पथकामध्ये देऊन कारभार सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली. (स्थानिक प्रतिनिधी)