शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगेच्या कोरड्या पात्रात उपोषण

By admin | Updated: March 31, 2017 02:28 IST

विदर्भ-मराठवाड्याची जीवनदायी पैनगंगा कोरडी पडल्याने इसापूर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याच्या मागणीसाठी या भागातील....

भीषण टंचाई : इसापूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणीउमरखेड : विदर्भ-मराठवाड्याची जीवनदायी पैनगंगा कोरडी पडल्याने इसापूर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याच्या मागणीसाठी या भागातील नागरिकांनी भोजनगर तांडा येथील पैनगंगेच्या कोरड्या पात्रात बुधवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. विदर्भ-मराठवाड्यातील अनेक गावातील नागरिक यात सहभागी झाले आहेत. पैनगंगा नदी यावर्षी हिवाळ्यातच कोरडी पडली. त्यामुळे नदीतीरावरील गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गत ५ मार्च रोजी इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले होते. परंतु गाजेगाव येथील बंधाऱ्याचे गेट बंद केल्याने खालच्या भागात पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे या तीरावरील अनेक गावात पाणीटंचाई कायम आहे. इसापूर धरणाचे पाच टीएमसी पाणी सोडावे, या मागणीसाठी बिटरगावजवळील भोजनगर तांडा येथे नागरिक उपोषणाला बसले आहे. त्यात विदर्भातील बिटरगाव, भोजनगर तांडा, रामरतननगर तांडा, मुरली, पिंपळगाव, लिंगी, सहस्त्रकुंड तर मराठवाड्यातील बोरगडी, धानोरा, शेलोडा, एकंबा, कवठा, शिरपल्ली, शेंदोडा, पळसपूर, डोल्हारी या गावातील नागरिकांचा समावेश आहे. अद्यापपर्यंत या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नाही. आता प्रशासन या प्रकरणी काय निर्णय घेते आणि पाणी केव्हा सोडते, याकडे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)