शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

By admin | Updated: March 30, 2017 00:12 IST

शेतमालाला अत्यल्प भाव, त्या नैराश्येतून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून जोवर शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होत नाही,

अशोकराव चव्हाण : सर्वपक्षीय ‘शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रा’ वणीत पोहोचली वणी : शेतमालाला अत्यल्प भाव, त्या नैराश्येतून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून जोवर शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे दिला. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बुधवारी दुपारी सर्वपक्षीय शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रेचे वणीत आगमन झाले. त्यानंतर स्थानिक शेतकरी मंदिरात एक सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, समाजवादी पार्टीचे अबु आजमी, माजी मंत्री पतंगराव कदम, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनील केदार, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, हर्षवर्धन सपकाळ, अमर काळे, यशोमती ठाकूर, गोपालदास अग्रवाल, अमित झनक यांच्यासह विरोध पक्षातील सुमारे ५० आमदार उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, भाजपाचे सरकार हे महाराष्ट्राच्या मुळावर उठले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला लोकशाही पद्धतीने वाचा फोडू पाहणाऱ्या १९ आमदारांना निलंबित करण्यात आले. आम्ही सत्तेत असताना शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला, मात्र भाजपा सरकार त्यासाठी चालढकल करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. याविरूद्ध आता समाजाने पेटून उठले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते एका वाहनात बसून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र आले. भाजपाचे सरकार उन्मत्त झाले आहे, या सरकारला जनतेची व लोकाशहिची गरज उरली नाही, राज्यात आठ हजार ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र भाजपा सरकारला त्याचे कोणतेही सोयरसुतक नाही, असा आरोप चव्हाण यांनी केला. यावेळी जोगेंद्र कवाडे यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाषणातून चर्चा केली. प्रास्ताविक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार वामनराव कासावार यांनी केले. संचालन राजाभाऊ पाथ्रडकर यांनी केले, तर आभार अ‍ॅड.देविदास काळे यांनी मानले. (कार्यालय प्रतिनिधी)