शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे सव्वा कोटींच्या वर अडकले

By admin | Updated: August 12, 2014 00:11 IST

नाफेडच्या वतीने यावर्षी मोठ्या प्रमाणात तूर आणि चण्याची खरेदी करण्यात आली. परंतु विक्री केलेल्या शेतमालाचे अद्यापपर्यंत पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे.

दारव्हा : नाफेडच्या वतीने यावर्षी मोठ्या प्रमाणात तूर आणि चण्याची खरेदी करण्यात आली. परंतु विक्री केलेल्या शेतमालाचे अद्यापपर्यंत पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सव्वाकोटीच्या वर रक्कम अडकून पडली असून, त्वरित पैसे मिहावे अशी मागणी आहे. शेतकऱ्यांना हमीभावाप्रमाणे शेतमालाचीे किंमत मिळावी याकरिता नाफेडकडून यवतमाळ जिल्ह्यात तूर व चन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. दहा हजार ८१९ क्विंटल तूर व आठ हजार ८०० क्विंटल चना खरेदी करण्यात आला. त्यामधील तुरीचे ४ कोटी ६५ लाख २२ हजार ४३१ रुपये आणि दोन कोटी ७१ लाख ८० हजार ९६१ रुपये पेमेंट झाले. परंतु त्यानंतर तूर विक्री करणाऱ्यांचे एक कोटी १७ लाख ५२ हजार ४३१ व चन्याचे १० लाख ९६१ रुपये अद्यापही देणे बाकी आहे. बाजार समितीच्या नियमानुसार विकलेल्या शेतमालाची रक्कम वजनमाप झाल्याबरोबर किंवा विक्री झाल्याबरोबर त्याच दिवशी दिली पाहिजे असा नियम आहे. परंतु गेल्या तीन-चार महिन्यापासून विकलेल्या मालाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही. यासंदर्भात हरीभाऊ गुल्हाने यांनी आवाज उठविला आहे. त्यांनी कृषी उतपन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघस्तरावर शेतकऱ्यांनी विक्री केलेल्याची रक्कम त्वरित मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. अडकलेल्या पैशाबाबत जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाकडे चौकशी केली असता नाफेडकडून पैसे न मिळाल्यामुळे सव्वाकोटीच्या वर देणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात नाफेडकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)