शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी आणली जिल्हा कचेरीवर जप्ती

By admin | Updated: August 30, 2016 02:26 IST

अरूणावती प्रकल्पाकरिता कळसा गावातील काही जमीन संपादित करण्यात आली. मोबदल्यासाठी

यवतमाळ : अरूणावती प्रकल्पाकरिता कळसा गावातील काही जमीन संपादित करण्यात आली. मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. २१ लाख रूपयांचा मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने देऊन वर्ष लोटले. मात्र मोबदला मिळाला नाही. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचा वॉरंट बजावला. यावेळी प्रशासनातर्फे एक महिन्याची मुदत मागण्यात आली. यामुळे जप्तीची नामुष्की तात्पुरती टळली. दिग्रस तालुक्यातील कळसा गावामधील जमीन पुनर्वसनासाठी भूसंपादन करण्यात आले. १९८६-८७ मध्ये सखूबाई किसन ढोण, शांताबाई हरी ढोण आणि पार्वताबाई श्रीरंग शेंडगे या शेतकऱ्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली. यावेळी १६००० रूपये प्रतिहेक्टर प्रमाणे मोबदला मंजूर करण्यात आला. तो अल्प असल्याने शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यासंदर्भात न्यायमूर्ती ए.एस. चांदूरकर यांनी २३ एप्रिलला शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. हेक्टरी दोन लाख ४० हजार रूपयांचा मोबदला देण्याचे आदेश दिले. यामुळे शेतकऱ्यांनी पैसे मिळण्याकरिता दारव्हा न्यायालयात दरखास्त दाखल केली. न्यायालयाने ३ आॅगस्ट २०१५ पर्यंत मूळ रकमेवरील व्याजासाठी २१ लाख ३३ हजार ५४ रूपये भरण्याचे आदेश काढले. यासंदर्भात ७ सप्टेंबर २०१५ रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अ‍ॅड. शेटे यांनी पैसे भरण्याची मुदत मागितली. मुदत संपल्यानंतरही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. यामुळे ७ जानेवारी २०१६ रोजी वॉरंटची प्रक्रिया करण्यात आली. १५ जानेवारीला वॉरंट निघाला. यावेळी एक महिन्याचा अवधी मागण्यात आला. जूनमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्रीकांत फडके यांनी जप्ती वॉरंटवर १५ दिवसात पैसे देण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतरही पैसे मिळाले नाही. यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्यासाठी वॉरंट काढला होता. हा जप्ती वॉरंट बजावण्यासाठी अ‍ॅड. महंमद इलियास शेखानी, बेलीफ अनिल निकम, रमेश नामदेव देडे, बुद्धीराज काटपेलवार आणि परमेश्वर किसन ढोण, श्यामराव श्रीरंग शेंडगे यांनी धडक दिली. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी जाजू, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता काटपेल्लीवार यांनी एक महिन्याचा कालावधी मागितला. शेतकऱ्यांनी त्याला परवानगी दिली. यामुळे जप्तीची नामुष्की टळली. (शहर वार्ताहर)