शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी शेतकरी हमीपत्र मोहीम

By admin | Updated: April 20, 2017 00:35 IST

शासनाने कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे हमीपत्र संपूर्ण राज्यातील

संभाजी ब्रिगेडचा पुढाकार : शासनाला देणार अल्टिमेटम यवतमाळ : शासनाने कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे हमीपत्र संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांकडून लिहून घेण्याचा उपक्रम संभाजी ब्रिगेडकडून राबविण्यात येणार आहे. त्यानंतर हे सर्व हमीपत्रे मुख्यमंत्र्यांना दाखवून कर्जमाफीसाठी त्यांना अल्टिमेटम देण्यात येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश धानोरकर यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. सत्ताधारी व विरोधी दोन्ही घटक सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे राजकारण करीत आहेत. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात संभाजी ब्रिगेडकडून ही मोेहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांकडून शासनाने कर्जमाफी केल्यास आम्ही आत्महत्या करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. हे लाखो हमीपत्र मुख्यमंत्र्यांना भेटून देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना कर्जमाफी तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या व इतर शेतकरी हिताच्या मागण्या मंजूर करण्यासाठी अल्टिमेटम देण्यात येणार आहे. तेंव्हा शेतकऱ्यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडे हे हमीपत्र लिहून द्यावे, असे आवाहनसुद्धा केले आहे. पत्रपरिषदेला संभाजी ब्रिगेडचे यवतमाळ विधानसभा अध्यक्ष बिपिन चौधरी, शहरप्रमुख अमित नारसे, शितल साळुंके, देवेंद्र कळसकर, मयुरी कदम, आकाश चंदनखेडे, प्रवीण देशमुख, कैलास भोयर, पराग पाटील, मयुरी देशमुख, प्रियंका शेंडे, डॉ. प्रशांत रोकडे, यशवंत इंगोले आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी) शितल हुंडाविरोधी पथक लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोली या गावातील शितल वायाळ या शेतकरी कुटुंबातील युवतीने हुंड्यामुळे आपला विवाह मोडत असल्याच्या काळजीतून आत्महत्या केली. समाजातून हुंडापद्धती नष्ट व्हावी, यासाठी संभाजी ब्रिगेडकडून ‘शितल हुंडा विरोधी पथका’ची निर्मिती करण्यात आली आहे. याद्वारा सर्व समाजातून हुंडापद्धती नष्ट व्हावी, यासाठी जनजागृती आणि प्रयत्न करण्यात येणार आहे. जिथे कुठे हुंड्याची देवाण-घेवाण होत आहे आणि ही माहिती जो कुणी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना वेळीच देईल, त्याला पाच हजार रुपये रोख बक्षिसही देण्यात येईल, अशी माहिती बिपिन चौधरी यांनी पत्रपरिषदेत दिली.