शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनी योजना ठरेल शेतकऱ्यांसाठी वरदान

By admin | Updated: August 26, 2014 00:16 IST

शेतकऱ्यांकडे असलेले कृषिपंपांचे थकीत बील भरण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. त्या अनुषंगाने बाभुळगाव येथील इंदिरा चौकात वीज वितरण कंपनीतर्फे

बाभूळगाव : शेतकऱ्यांकडे असलेले कृषिपंपांचे थकीत बील भरण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. त्या अनुषंगाने बाभुळगाव येथील इंदिरा चौकात वीज वितरण कंपनीतर्फे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे कार्यकारी अभियंता पंकज तगलपल्लेवार होते. कृषी संजीवनी योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल असे प्रतिपादन त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. या कार्यक्रमात एकमुस्त वीज बील भरणाऱ्या पाच शेतकऱ्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बाभूळगावचे सरपंच मारोतराव गाजलेकर, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अमर घारफळकर, दिनकर कोंबे, वीज सल्लागार नरेंद्र देशमुख, ज्ञानेश्वर जुनगरे, उप कार्यकारी अभियंता एस.व्ही. झाडे, माजी सरपंच भारत इंगोले आदी उपस्थित होते. कृषी ग्राहकांना ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या मूळ रकमेची ५० टक्के रक्कम एकमुस्त किंवा तीन मासिक हप्त्यांमध्ये भरल्यास उर्वरित रक्कम महाराष्ट्र शासनातर्फे महावितरणला देण्यात येणार आहे. तसेच या योजनेंतर्गत कृषी ग्राहकांचे थकीत असलेले पूर्ण व्याज व दंड माफ करण्यात आला आहे. उरलेल्या ५० टक्के रकमेचे तीन हप्ते पाडून दिले जाणार आहे. त्यामध्ये ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत कमीतकमी २० टक्के बील भरने अनिवार्य आहे, अशी माहिती अभियंता झाडे यांनी आपल्या भाषणा दिली. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनसुद्धा झाडे यांनी केले.यावेळी तालुक्यातील पूर्ण वीज बील एकमुस्त भरणारे शेतकरी मनोहर एकनाथ भोयर, गोदाबाई घुले, नामदेव गोडे, दीपक कराळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी बाभूळगाव उपविभागातील सहाय्यक अभियंता संजय कांबळे, नवनीत सावरकर, विजय साव, शेख रहीम, नीलेश गाडगे, विशाल कडू, सुनील राऊत, आस्वले, जीवन दहापुते आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)