शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
5
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
6
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
7
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
8
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
9
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
10
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
11
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
12
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
13
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
14
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
15
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

प्रशासनाच्या चुकीचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: July 21, 2016 00:02 IST

बिकट परिस्थितीशी झुंज देत व निसर्गासोबत दोन हात करून ताठ मानेने जगणाऱ्या बळीराजाला प्रशासनाच्या चुकीमुळे पीक विम्यापासून वंचित राहावे लागणार

नेर तालुक्यात रोष : शेकडो शेतकरी राहणार पीक विम्यापासून वंचित नेर : बिकट परिस्थितीशी झुंज देत व निसर्गासोबत दोन हात करून ताठ मानेने जगणाऱ्या बळीराजाला प्रशासनाच्या चुकीमुळे पीक विम्यापासून वंचित राहावे लागणार असल्याची पाळी आली आहे. सध्या ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा बँकेत जमा करायचा आहे. मात्र सातबारा आॅनलाईनची प्रक्रिया पूर्णच न झाल्याने शेकडो शेतकरी पीक विम्याला मुकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. शासनाने पीक विम्याबाबत १ एप्रिल ते ३१ जुलै असे वेळापत्रक ठरवून दिले आहे. या दरम्यानच पीक विमा भरण्याचे बंधनकारक आहे. कर्जदार व बिगर कर्जदार यांना बँकेने शेतकऱ्यांची विमा घोषणापत्र विमा कंपनीस तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थेच्या बाबतीत जिल्हा मध्यवर्ती बँकेस ३१ जुलैनंतर १५ दिवसात सादर करायचे आहे. ३१ जुलैनंतर सात दिवसात बँकेने पीक विम्याचे अर्ज व रक्कम सात दिवसात भरायची आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत राष्ट्रीय कृषी विमा योजनेतील तरतुदीनुसार नुकसान भरपाई निश्चित करण्यात येईल, असे आदेश आहे. असा आदेश असतानाही शेतकरी पैशांची जुळवाजुळव करून पीक विमा भरण्याच्या तयारीत आहेत. शासनाने प्रशासनाला शेतकऱ्याचा सातबारा, फेरफार, आठ-अ आॅनलाईन करण्याची डेडलाईन ३० जूनपर्यंत दिली होती. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांची ढिसाळ कामगिरी पाहता अद्याप आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. यामुळे शेकडो शेतकरी पीक विमा अर्ज सादर करण्यासाठी तलाठ्याकडे सातबाराची मागणी करताना दिसत आहेत. परंतु आॅनलाईन प्रक्रियाच सुरू न झाल्याने व आॅनलाईन सातबारा उपलब्ध नसल्याने आगामी आठ-दहा दिवसात दस्तऐवजाची जुळवाजुळव करून अर्ज कसा करावा, या विवंचनेत शेतकरी वर्ग आहे. एककीडे तलाठी हस्तलिखित सातबारे द्यायला तयार नाहीत, तर दुसरीकडे शासनाची आॅनलाईन प्रक्रियाही बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुणाकडे जावे, हा प्रश्न कायम आहे. यामध्येच जे शेतकरी कर्जाच्या रकमेची परतफेड करू शकले नाही, अशा शेतकऱ्यांबाबत प्रशासनाने सहानुभूतीचे धोरण ठेऊन त्यांचा पीक विमा बँकेने भरावा, असाही शासकीय आदेशात उल्लेख आहे. मात्र या आदेशाला बँकेने नकारघंटा दर्शवून शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्यास नकार दिला आहे. एकीकडे शासनाचे, दुसरीकडे बँकेचे , तर तिसरीकडे प्रशासनाचे वेगवेगळे धोरण आणि निष्काळजीपणा या सर्वांमध्ये सर्वसामान्य शेतकरी मात्र भरडला जात आहे. (तालुका प्रतिनिधी) आॅनलाईनमुळे निर्माण झाला घोळ शासनाने सातबारा व सबंधित सर्व कागदपत्र आॅनलाईन केले आहे. परंतु आॅनलाईन प्रक्रियेबाबत महसूल विभागाचेच तलाठी व सबंधित कर्मचारी अनभिज्ञ असल्याचे दिसते. अनेकांना याबाबत योग्य माहिती नाही. सर्व प्रकारची माहिती अपलोड करण्याच्या कामात प्रचंड दिरंगाई सुरू आहे. तोपर्यंत किमान हस्तलिखित कागदपत्रांवर कामे सुरू ठेवेण गरजेचे होते, परंतु ते होताना दिसत नाही. या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठांचेही दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना मात्र फटका बसत आहे.