शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची ‘ओटी’वर उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:14 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात नियोजनाची पूर्णत: वाट लागली आहे. जिल्ह्यातील जवळपास आगाराच्या उत्पन्नाचा आलेख घटलेला आहे.

ठळक मुद्देयवतमाळ आगार : तोट्याचा कांगावा, विभागात नियोजनाची ऐसीतैसी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात नियोजनाची पूर्णत: वाट लागली आहे. जिल्ह्यातील जवळपास आगाराच्या उत्पन्नाचा आलेख घटलेला आहे. यासाठी विविध कारणांचा पाढा वाचला जातो. मात्र काही बाबींवर प्रचंड उधळपट्टी होत आहे. विशिष्ट कामगारांना दिली जाणारी अतिरिक्त कामगिरी आणि त्यापोटी दिला जाणारा अतिकालिक भत्ता (ओ.टी.) हे एक प्रमुख कारण आहे. प्रामुख्याने यवतमाळ आगारात सुरू असलेला हा प्रकार विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकाºयांकडून सोयिस्कर दुर्लक्षित आहे.कमी वेतनश्रेणीच्या कामगारांना अतिरिक्त कामगिरी द्या, अशा महामंडळाच्या सूचना आहेत. या वेतनश्रेणीतील कामगारही यासाठी उत्सुक आहे. परंतु स्थानिक पातळीवरील अधिकारी या सर्व बाबी बाजूला सारून विशिष्ट लोकांचे हित जोपासत असल्याचे दिसून येत आहे. ७० रुपये तास अतिकालिक भत्ता असलेल्या अर्थात कमी वेतनश्रेणीच्या कामगारांऐवजी २०० रुपये तास भत्त्याचा दर असलेल्या कामगारांना डबल ड्यूटी दिली गेल्याचे प्रकार यवतमाळ आगारात पुढे आले आहे. एवढेच नाही तर १०० तासांच्यावर अतिरिक्त ड्यूटी करून हजारो रुपये अतिकालिक भत्ता काही कामगारांनी उचलला आहे. दरमहा सुमारे आठ ते नऊ लाख रुपये अतिकालिक भत्त्यापोटी जादा दिले जात आहे. म्हणूनच आगार तोट्यात असल्याची ओरड कामगारांमधून होत आहे. विशिष्ट कामगारांनाच अतिरिक्त कामगिरी दिली जात असल्याच्या बाबीवर कामगारांमधून शंका उपस्थित केली जात आहे. संबंधित कामगारांच्या वेतनाचा हिशेब केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.कामगार तुटवड्याचा कांगावाचालक-वाहकांचा तुटवडा असल्याचे कारण पुढे करून अतिरिक्त कामगिरी सोपविली जाते. हा निव्वळ कांगावा आहे. अनेक चालकांना इतर ठिकाणी अर्थात सोयीच्या जागी ड्यूटी दिली जात आहे. प्रामुख्याने चालकांना याठिकाणी गुंतविले गेले आहे. वर्कशॉप, विभागीय कार्यालय वर्कशॉप आदी ठिकाणी चालकांची ड्यूटी लावली गेली. दोन-चार दिवसच नव्हे तर काही चालकांना महिना-महिना ‘निमआराम’ कामगिरी देण्यात आली आहे. याठिकाणी त्यांचा आर्थिक लाभ नसला तरी आरामदायी ड्यूटी मिळावी यासाठी ही सारी सर्कस करण्यात आली आहे. परिणाम मात्र वाहक तुटवड्यावर सांगितला जात आहे.