शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: January 9, 2016 02:59 IST

बळीराजा चेतना अभियान शेतकऱ्यांना आत्मविश्वास देण्यासोबतच त्यांच्यात मनोधर्य निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.

यवतमाळ : बळीराजा चेतना अभियान शेतकऱ्यांना आत्मविश्वास देण्यासोबतच त्यांच्यात मनोधर्य निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. हे काम करतानाच कीर्तनकार, प्रवचनकार तथा सामाजिक संस्थांनी विविध शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.बळीराजा चेतना अभियानांतर्गत जनजागृतीचे कार्यक्रम राबविणारे कीर्तनकार, प्रवचनकार, कलापथक, कलावंत, सामाजिक संस्था, कवी, साहित्यिक, नाट्यकलावंत, लेखक यांच्यासह उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांची संयुक्त बैठक येथील बचत भवनात झाली. यावेळी ते बोलत होते.बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी दीपककुमार सिंगला, विकास माने, संदीप अपार, विधळे, चेतन गिरासे आदी उपस्थित होते. बळीराजा चेतना अभियान खऱ्या अर्थाने कीर्तनकार, प्रवचनकारांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे चांगले वातावरण जिल्ह्यात तयार झाले आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कीर्तनकार, प्रवचनकारांचे कौतुक व केले. शासनाने स्वस्त दरात गहू व तांदुळ वितरणाची योजना सुरू केली आहे. जीवनदायी आरोग्य योजना, पिककर्ज योजना, जनधन योजना, श्रावणबाळ योजना यासह अनुदानाच्या आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाच्या अनेक योजना आहते. त्याही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी अभियानांतर्गत जिल्हाभर राबविल्या जात असलेल्या जनजागृती कार्यक्रमाची माहिती दिली.कीर्तनकार, प्रवचनकार, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ठिकठिकाणी सादर करावयाच्या जनजागृती कार्यक्रमाचे नियोजनही यावेळी करण्यात आले. (वार्ताहर)