शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

प्रयोगशील शेतकऱ्याने केळी तर पिकवलीच पण चिप्सचाही व्यवसाय सुरू केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 17:43 IST

Yawatmal news शेती आणि संकटाचे अतूट नाते आहे. संकटातून शेतकऱ्यांची सुटका नाही. याची जाणीव ठेवून अडचणीवर मात कसे करता येईल याचा मार्ग शोधणे शेतकऱ्यांनी सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेती आणि संकटाचे अतूट नाते आहे. संकटातून शेतकऱ्यांची सुटका नाही. याची जाणीव ठेवून अडचणीवर मात कसे करता येईल याचा मार्ग शोधणे शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील हरसुल या गावचे राजेश प्रभाकर सवने असेच एक प्रयोगशील शेतकरी आहे. त्यांनी मागील तीन वर्षांपासून केळी उत्पादन दरम्यान आलेल्या अनेक अडचणीवर मात करून आपल्या शेतीला ऊभारी देण्याचा प्रयत्न केला आहे.राजेश सवने यांनी तीन वर्षापूर्वी आपल्या शेतात केळीची सहा हजार झाडे लावली होती. फळबागेतून चांगले उत्पन्न मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु पहिल्या वर्षी अत्यंत तीव्र उन्हाळा आल्याने त्या वर्षी बाग जळून गेली. तेव्हा त्यांना जवळपास सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. त्या नंतर दुसऱ्या वर्षी जेव्हा फळधारणा झाली आणि तोडणीला आले तेव्हा कोरोनाने पाय पसरले होते. त्यामुळे गगनाला असलेले केळीचे भाव जमीनदोस्त झाले. त्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. परंतु या संकटातून मार्ग कसा काढायचा यावर त्यांनी विचार केला. शेती म्हटल्यानंतर संकटे येणारच हे त्यांना कळून चुकले होते. स्वत: केळीवर आधारित प्रक्रिया करून विकायचे ठरविले. याची सुरुवात त्यांनी केळी पिकविण्याची भट्टी लावून स्थानिक पातळीवर स्वत: विक्री केली. त्या मध्ये जेमतेम पैसे वसूल झाले. परंतु कळून चुकले होते की शेती संकटातून सावरायचे असेल तर नवनवीन प्रयोग करणे गरजेचे आहे.

या दृष्टिकोनातून या वर्षी केळी पिकावर विशेष प्रक्रिया करून विक्री करण्याचे ठरविले. आणि आपल्या शेतातच कच्या केळीपासून चिप्स तयार करण्याचे ठरविले. सदर उत्पादन आधी स्थानिक पातळीवरील लोकांपर्यन्त पोहोचविण्याचे ठरविले. करिता तयार केळी चिप्स अत्यंत माफक दरामध्ये विक्री सुरू केली आहे. या सर्व घडामोडीतून राजेश सवने यांनी अडचणीवर मात केली आहे. शिवाय अनेक लोकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.

टॅग्स :agricultureशेती