शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
4
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
5
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
6
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
7
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
8
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
9
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
10
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
11
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
12
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
13
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
14
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
15
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
16
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
17
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
19
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
20
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका

तरुणाई इंटरनेटच्या मायाजालात

By admin | Updated: June 28, 2014 01:16 IST

इंटरनेटमुळे जग जवळ आले. माहिती आणि तंत्रज्ञानाची वाट सुकर झाली. अद्यावत माहिती क्षणात उपलब्ध करून देणारे इंटरनेटचे जाळे आता तरुणाईलाच मायाजाळात अडकवित आहे.

संतोष अरसोड यवतमाळ इंटरनेटमुळे जग जवळ आले. माहिती आणि तंत्रज्ञानाची वाट सुकर झाली. अद्यावत माहिती क्षणात उपलब्ध करून देणारे इंटरनेटचे जाळे आता तरुणाईलाच मायाजाळात अडकवित आहे. अनेकांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केलेल्या अश्लील चित्रफितीही आढळून येतात. मात्र पालकांपासून सोईस्कररीत्या लपविल्या जाते. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पालकांच्या हा प्रकार लक्षात येतो. परंतु डोक्यावर हात मारून घेण्यापलिकडे त्यांच्याकडे पर्याय नसतो. यासाठी पालकांनी वेळीच जागरुक होणे गरजेचे आहे. सध्या तरूण पिढीसह अल्पवयीन मुलेही अश्लीलतेच्या जाळ्यात अडकली आहे. सायबर कॅफेवर जाऊन आपली मुले काय करतात, याकडे पालकांचे लक्ष नसते. कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि अ‍ॅन्ड्राईड फोनच्या नादी लागल्याने शिक्षण घेतांनाच अनेक जण अश्लीलतेच्या विळख्यात अडकतात. काही मोबाईल कंपन्यांच्या वेबसाईडवर अर्धनग्न देहांचे दर्शन होते आणि येथूनच सुरू होतो अश्लीलतेच्या घाणेरड्या अन् घातक वाटेवरील प्रवास. शहरातील एका समुपदेशन केंद्रात भेट दिली असता अनेक गंभीर विषय समोर आले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विभिन्न लिंगी आकर्षण असते. प्रत्येकाला बॉयफ्रेन्ड किंवा गर्लफे्रन्ड असावी, असे वाटते. गर्लफ्रेन्ड नसलेल्यांना मित्र परिवारातील टोळके चिडवत असतात. यातूनच निर्माण झालेले आकर्षण मुलींसाठी भविष्यात घातक ठरते. प्रेमाचे अनेक प्रसंग बॉयफ्रेन्ड त्याच्या मोबाईलमध्ये कैद करतो. मात्र एकवेळ अशी येते की, त्यांचे संबंध अचानक तुटून जातात. अशा वेळी मुलगी मात्र आपल्या मोबाईलमधील प्रियकरासोबत असलेले सगळे प्रसंग डिलिट करते. मात्र मुलगा ते प्रसंग डिलिट करत नाही. यातूनच भविष्यात त्या मुलीला ब्लॅकमेल करण्याचे प्रकारही घडतात. हे प्रकार एवढे किळसवाणे होतात की नंतर जुन्या बॉयफ्रेन्डच्या मित्रांकडूनसुद्धा युवतींचे शोषण व्हायला लागते. अशा वेळी कुणीच बदनामीच्या भीतीपोटी पोलिसांकडे जात नाही. मात्र समुपदेशन केंद्रामध्ये येऊन यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. यवतमाळातही अशाच प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत, हे विशेष!आपला मुलगा अथवा मुलगी काय करते, याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे असते. त्यातही मुलींमध्ये या बाबत जागृती असणे आवश्यक आहे. ज्याच्यासोबत आपण प्रेम करतो तो आपला गैरफायदा तर घेत नाही ना, याची तिने काळजी घेतली पाहिजे. तसेच ज्या ठिकाणी प्रेमाच्या गप्पा होतात तिथे सीसीटीव्ही कॅमेरे तर लागले नाही ना, याचीसुद्धा मुलींनी काळजी घेतली पाहिजे. सध्या मोबाईल अनेक तरुण-तरुणी आपला महत्त्वपूर्ण वेळ घालवत असतात. अशा वेळेला रात्रीच्या वेळी आपले पाल्य लॅपटॉप, कॉम्प्युटर अथवा मोबाईलवर काय करीत असतात, याबाबत पालकांनी दक्ष राहणे गरजेचे असते.