शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

अखेर राष्ट्रवादीने कोंडी फोडली

By admin | Updated: July 14, 2014 01:34 IST

भाजप नगरसेवकांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर

भाजपावर शरसंधान : आघाडीचाच नगराध्यक्ष, रात्रभर घडामोडीयवतमाळ : भाजप नगरसेवकांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शहरात भाजपचाच नगराध्यक्ष व्हावा अशी भूमिका घेतली होती. शहर विकास आघाडीतील राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू होता. राष्ट्रवादीनेही पालिकेतील दिग्गज आणि जेष्ठ सदस्यांचे नाव समोर केले. तसेच शनिवारी दुपारी भाजपच्या बैठकीत काही सदस्यांनी आघाडीचे नेते ठरवतील त्याच उमेदवाराला पाठिंबा राहील असे स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीने अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फेरत कोंडी फोडली.सर्वपक्षीय नगरसेवकांची शनिवारी रात्री काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या घरी उशिरापर्यंत बैठक झाली. यात संख्याबळाची चाचपणी घेण्यात आली. आर्थिक अडचण आल्याने ही बैठक कोणताच निर्णय न होता संपली. या बैठकीवर लक्ष ठेऊन असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने नेते प्रभावहीन ठरत असल्याचे लक्षात येताच सूत्र हाती घेतेले. काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या घरून बाहेर आलेल्या नगरसेवकांना आपल्या बाजूने वळविले. तब्बल २४ सदस्य या उमदेवाराच्या संपर्कात आहेत, शिवाय येईल त्याला सामावून घेण्याची भूमिका त्या उमेदवाराने घेतली आहे. तसेच या उमेदवाराला नगराध्यक्षपदासाठी समर्थन देण्याचा शब्द पालिकेतील दिग्गज नेत्याने दिला आहे. या दोलायमान स्थितीत काँग्रेस श्रेष्ठीकडून कोणताच आदेश आला नाही. त्यांची भूमिका काय राहते याकडे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)घोडेबाजार तेजीत नगराध्यक्षपदासाठीचा घोडेबाजार जोरात सुरू झाला आहे. अधिक वजन ठेवणाऱ्यांच्या बाजूने जाण्याची अनेकांची तयार आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या घरी अध्यक्ष - उपाध्यक्षाचे नाव निश्चित करण्यात आले होते. मात्र पैसे कोण लावणार यावरून बोलणी फिस्कटली. १५ जुलै रोजी नगराध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल करावयाचे असल्याने त्यापूर्वीच संख्याबळाची गोळाबेरीज केली जात आहे. ‘त्या’ बैैठकीनंतर फिरला निर्णय नगरपरिषदेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या नेत्याच्या घरी शुक्रवारी रात्री भाजप नेत्याची बैैठक झाली. यानंतरच भाजपची भूमिका बदलली शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष करण्याची मागणी पुढे आली. त्यानंतर राजकीय समिकरणाला कलाटणी मिळाली.