शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वाढोणाची सूतगिरणी सुरू होण्यापूर्वीच अवसायनात

By admin | Updated: August 29, 2016 00:59 IST

तालुक्याच्या वाढोणाबाजार येथील प्रस्तावितच सूतगिरणी अवसायनात निघाली आहे. सहायक निबंधक अ.श. उल्हे यांची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सहायक निबंधक अवसायक : २५ वर्षांपूर्वीचे स्वप्न भंगलेके.एस. वर्मा  राळेगावतालुक्याच्या वाढोणाबाजार येथील प्रस्तावितच सूतगिरणी अवसायनात निघाली आहे. सहायक निबंधक अ.श. उल्हे यांची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी या संस्थेचे संपूर्ण दप्तर ताब्यात घेतले आहे. संस्थेकडून कोणाचीही देणी वा घेणी असल्यास पुराव्यासह लेखी मागणी करण्याबाबतची सूचना अलीकडेच बजावण्यात आली आहे. ही संस्था सुरू होण्यापूर्वीच २५ वर्षांपूर्वीचे स्वप्न भंगले आहे. सन १९९२ मध्ये राळेगाव तालुक्यात सहकारी सूतगिरणी उभी करण्यासाठी दीपक एंबडवार यांनी मुख्य प्रवर्तक म्हणून पुढाकार घेतला होता. त्या काळात १७५ सभासदांकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांचा शेअर याप्रमाणे निधी गोळा करण्यात आला. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वाढोणाबाजार शाखेत हा निधी जमा करण्यात आला. सूतगिरणी उभी व्हावी यासाठी एंबडवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप प्रयत्न केले. राळेगाव तालुक्याचे संपूर्ण सहकार क्षेत्र व राजकीय क्षेत्र यावर त्याकाळी एंबडवार गटाचा ताबा होता. सक्षम विरोधक त्या काळात त्यांना नव्हते. तद्वतच नानाभाऊ एंबडवार दोन-अडीच वर्षे वन व महसूलमंत्री होते. त्यामुळे सूतगिरणी स्थापन करण्याकरिता अनुकूल वातावरण होते. सूतगिरणीकरिता सुरुवात झाली. मात्र त्यानंतर प्रयत्नात सातत्य राखण्याऐवजी शिथिलता येत गेली. कालांतराने राजकारणात एंबडवार मागे पडले. हळूहळू सूतगिरणी हा विषय विस्मरणात गेला. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सूतगिरणीकरिता प्रयत्न झाले. बाजूच्याच कळंब व वणी येथेही तसा प्रयत्न झाला. पण जिल्ह्यात अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी सूतगिरण्या उभ्या राहू शकल्या नाही. वाढोणाबाजार येथील सूतगिरणीही त्याच मार्गावर गेली. साधी सूतगिरणीसाठी जागा खरेदी करण्याची सुरुवातही त्या काळी होवू शकली नाही. शेतकऱ्यांचे, भागधारकांचे, जनतेचे, बेरोजगारांचे त्याकाळी पाहिलेल्या एका स्वप्नाचा चुराडा याप्रमाणे झाला. याचबरोबर निकट भविष्यातही या व अशाच कोणत्याही मोठ्या सहकार प्रकल्पाची आशा संपुष्टात आली आहे.संचालक वस्त्रोद्योग तथा अतिरिक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र शासन नागपूर यांच्या आदेशानुसार वाढोणाबाजारची सहकारी सूतगिरणी अंतिमत: अवसायनात गेलेली आहे. तशा नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. संस्था उभी होण्यापूर्वीच अवसायनात निघाल्यामुळे अनेकांचा स्वप्नभंग झाला आहे.