शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

पराभवानंतरही काँग्रेसचा ग्रामीण भागात वरचष्मा

By admin | Updated: February 25, 2017 00:57 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल घोषित झाले. या निकालावरून नजर टाकल्यास अद्यापही ग्रामीण भागात

सर्वाधिक दुसऱ्या स्थानी : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक रवींद्र चांदेकर  यवतमाळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल घोषित झाले. या निकालावरून नजर टाकल्यास अद्यापही ग्रामीण भागात काँग्रसेचा वरचष्मा कायम असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेच्या ६१ जागांपैकी शिवसेनेने सर्वाधिक २० जागा पटकावल्या. भाजपाने १८ आणि काँग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी ११ जागा मिळविल्या. केवळ एका ठिकाणी अपक्षाला विजय मिळाला. तथापि ६१ पैकी सर्वाधिक २३ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले. या गटांमधून दुसऱ्या पक्षाचे उमेदवार निवडून आले. काँग्रेसच्या उमेदवारांना आणखी थोडी ताकद मिळाली असती, तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. यापैकी काही उमेदवार थोडक्या मतांनी पराभूत झाले. या २३ पैकी किमान १० ते १२ उमेदवार विजयी होणे सहज शक्य होते, असे निकालावरून दिसून येते. जिल्हा परिषदेच्या ६१ पैकी १३ गटांमध्ये भाजपाचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले. शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी ११ उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिले. एका गटामध्ये काँग्रेसचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार दुसऱ्या स्थानी आहे. यावरून काँग्रेसच सर्वाधिक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट होते. त्यापैकी निम्मे उमेदवार जरी विजयी झाले असते, तर काँग्रेस जिल्हा परिषदेत सर्वाधिक मोठा पक्ष ठरला असता, हे निश्चित. मात्र काँग्रेस नेते त्यात अपयशी ठरले. तसेच अनेक गटांमध्ये त्यांची उमेदवार निवडही चुकल्याचे दिसून येत आहे. शिवसेना नेत्यांनी सर्व लक्ष प्रामुख्याने दारव्हा, दिग्रस, नेर परिसरावरच केंद्रीत केल्याचे दिसते. वणी, मारेगाव, झरी परिसरावरही त्यांचे लक्ष होते. तथापि तेथे त्यांची ताकद कमी पडल्याचे स्पष्ट झाले. मात्र दारव्हा, दिग्रस, नेर तालुक्यात शिवसेनेने इतर सर्वांना भूईसपाट केले. या पक्षाचे दुसऱ्या क्रमांकावरील निम्मे उमेदवार विजयी झाले असते, तर शिवसेनेचा आकडा निश्चितच २५ च्या पुढे गेला असता. तीच स्थिती भाजपाची असून त्यांचे दुसऱ्या क्रमांकावरील निम्मे उमेदवार विजयी झाले असते, तर त्यांचाही आकडा २५ च्या जवळपास पोहोचला असता. एकूणच सर्वच पक्षांनी थोडी ताकद लावली असती तर बहुमतानजीक पोहोचले असते.