शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये भर रस्त्यावर भरतो आठही दिवस बाजार

By admin | Updated: February 15, 2017 02:51 IST

शहरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी असलेली छोटीमोठी दुकाने थेट रस्त्यावरच थाटली जात आहे.

जनावरांचा हैदोस : शहराच्या स्वच्छतेची ऐसीतैसी पुसद : शहरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी असलेली छोटीमोठी दुकाने थेट रस्त्यावरच थाटली जात आहे. जणू आठही दिवस रस्त्याला आठवडी बाजाराचे स्वरूप येते. या बाजारात जनावरांचा मुक्त संचार असून, रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या केरकचऱ्याने शहराची स्वच्छता धोक्यात आली आहे. शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातील नागरिक विविध वस्तुंच्या खरेदीसाठी शहरात येतात. नागरिकांची गरज लक्षात घेऊन ठिकठिकाणी व्यापारी संकुलही बांधली आहेत. परंतु अलिकडे व्यापारी संकुलांऐवजी अनेकांनी आपली दुकाने थेट रस्त्यावर थाटली आहेत. त्यात भाजीपाला, फळे, रेडीमेट कापड, धान्य यासह इतर वस्तुंचा समावेश आहे. मुख्य रस्त्यालगतच ही दुकाने लावली जात आहे. खाद्य पदार्थांची दुकानेही दिसून येत आहे. शहराच्या भाजी मार्केट परिसरात हातगाडीवाले अर्ध्यारस्त्यापर्यंत ठिय्या मांडून असतात. विशेष म्हणजे, भाजी मार्केट असले तरी तेथे जायला कुणी तयार नसते. त्यामुळे विक्रेते रस्त्यावर दुकान मांडतात. या भाजी बाजारात जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावर भरणाऱ्या बाजारामुळे शहराची वाहतूक प्रभावित होते. आधीच बेशिस्त असलेल्या वाहतुकीने बाजार परिसरातील वाहतूक ठप्प होते. आॅटोरिक्षा, दुचाकी, चारचाकी आणि मालवाहू वाहने याच भागातून ये-जा करतात. त्यामुळे या परिसरात अपघाताहीची भीती असते. सुभाष चौकातील व्यापारी संकुलापुढे अनेक जण छोटे दुकान लावून बसतात. बसस्थानक ते शिवाजी चौक या परिसरातही मोठ्या प्रमाणात व्यावसायिक दिवसभर ठिय्या देऊन असतात. या सर्व प्रकाराकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर भरणाऱ्या बाजाराने ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येते. भाजीबाजारात तर सडलेला भाजीपाला थेट रस्त्यावर टाकल्या जातो. त्यावर मोकाट जनावरे तुटून पडतात. तसेच मोठ्या प्रमाणात धूळही या पालेभाज्यांवर बसते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो. शहरात दररोज भरणाऱ्या या बाजारामुळे आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (कार्यालय चमू)