शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

झाडगावात होते घरोघरी गौरीची स्थापना

By admin | Updated: September 9, 2016 02:40 IST

जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील झाडगावची ओळख ‘गौरींचे गाव’ म्हणून झाली आहे. या गावात जवळपास घरोघरी महालक्ष्मींची स्थापना केली जाते.

महालक्ष्मीचे गाव : प्रत्येक घरी तीन दिवस असते पाहुण्यांची मांदियाळीयवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील झाडगावची ओळख ‘गौरींचे गाव’ म्हणून झाली आहे. या गावात जवळपास घरोघरी महालक्ष्मींची स्थापना केली जाते. प्रत्येक घरी पाहुण्यांची रेलचेल असते. झाडगाव हे जेमतेम चार हजार लोकवस्तीच गावं. गावात जवळपास साडेसातशे घराची वस्ती. मात्र त्यापैकी तब्बल ३०० च्यावर घरी महालक्ष्मींची स्थापना केली जाते, हेच या गावाचे वैशिष्ट्य. दर एका घराआड या गावात गौरींची विधीवत स्थापना केली जाते. विशेष म्हणजे एकच आडनाव असलेल्या अनेक घरी गौरींची स्थापना केली जाते. गौरी स्थापना, पूजन आणि गौरी विसर्जन, या तीन दिवस गावात अक्षरश: जत्रा असते. घरोघरी पाहुण्यांची वर्दळ असते. ज्यांच्या घरी महालक्ष्मींची स्थापना होत नाही, त्यांच्या घरच्या लेकी-सुनांसह आप्तस्वकीयही यावेळी गावात पोहोचतात.तीन दिवस गावात पाहुण्यांची रेलचेल असते. या गावातील व्यक्ती राज्यात, देशात कुठेही राहात असेल, तर ती व्यक्ती या सणाला गावात परत येते. एकवेळ दिवाळीला कुणी गावाकडे फिरकणार नाही, मात्र गौरी पूजनाला सर्वांची पावले आपोआप माघारी फिरतात. ग्रामस्थांचे आप्तेष्ट, मित्र यांचीही गावात वर्दळ असते. गौरी जेवणाच्या दिवशी तर गावाला अक्षरश: जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. गावात जेवणासाठी माणूस मिळणेही कठीण होते. एका-एका व्यक्तीला चार-चार घरचे आवतन असते. तरीही प्रसाद म्हणून ‘आंबील’ ग्रहण करण्यासाठी चढाओढ सुरू असते. गेल्या कित्येक वर्षांपासून झाडगावात थाटात गौरींची आगमन होते. दुसऱ्या पूजन आणि तिसऱ्या दिवशी विजर्सन होते. गावात विविध धर्मीयांचे वास्तव्य आहे. मात्र आजपर्यंत या सणाला कधीही गालबोट लागले नाही. एकोप्याने हा उत्सव साजरा केला जातो. विशेष म्हणजे मुस्लीम समाजातील वृद्ध महिला बांगड्यांचा व्यवसाय करते. त्या वृद्धेच्या कोऱ्या बांगड्या अनेक घरांतील महालक्ष्मींच्या हातात घातल्या जातात. एकूणच अत्यंत आनंदाने आणि एकमेकांच्या भावना जोपासात सर्वधर्मीय बांधव हा गौरी उत्सव साजरा करतात. त्यातून गावात सामाजिक सलोखा कायम राहण्यास सैदव मदत होत आहे. (शहर प्रतिनिधी)तीन दिवस दिवाळीचेझाडगावात गौरी पूजनाच्या तीन दिवसांत दिवाळीचा भास होतो. एकवेळ दिवाळीला गावात एवढी गर्दी आणि रेलचेल दिसणार नाही. त्यामुळे राळेगाव तालुक्यात व जिल्ह्यातही झाडगावची ओळख ‘गौरींचे गाव’ म्हणून झाली आहे. अनेक घरी तर केल्या १५0 वर्षांपासून व त्यापूर्वीपासूनही गौरींचे स्थापना केली जात आहे. त्यामुळेच गौरी पूजनाला या गावात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हल्लीच्या आधुनिक आणि विज्ञानवादी युगातही या गावात हा धार्मिक सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जात आहे.