शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

‘पेसा’ गावांमध्ये दारुबंदीची अंमलबजावणी करा

By admin | Updated: July 23, 2016 00:14 IST

पंचायत क्षेत्र विस्तार कायदा अर्थात पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांना कायद्याने मोठ्या प्रमाणावर स्वायत्तता बहाल केली आहे.

किशोर तिवारी : पेसा कायद्यांतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा, गावकऱ्यांनी पेसा कायदा समजून घ्यावा यवतमाळ : पंचायत क्षेत्र विस्तार कायदा अर्थात पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांना कायद्याने मोठ्या प्रमाणावर स्वायत्तता बहाल केली आहे. गावांनी हा कायदा समजून घेणे आवश्यक आहे. दारुबंदीसाठी गावांना थेट निर्णय घेण्याची सुविधा कायद्यात आहे. या कायद्यातील तरतुदीचा लाभ घेत पेसा गावांमध्ये पूर्णपणे दारुबंदीची अंमलबजावणी करा, असे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन निमशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले. पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पेसा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या सहा तालुक्यांतील १६४ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आणि कार्यशाळेचे आयोजन पांढरकवडा येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष वंदना राय, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, उपविभागीय अधिकारी दीपककुमार मिना, उपवनसंरक्षक गुरुप्रसाद, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गायनर, पंचायत समिती सभापती मल्लारेड्डी पानजवार, उपसभापती रेणुका गेडाम, पंचायत समिती सदस्य रितेश परचाके, सुभाष राठोड, सविता तेलंगे आदी उपस्थित होते. तिवारी म्हणाले, पेसा गावांना कायद्याने अनेक अधिकार बहाल केले आहेत. अनेक निर्णय ग्रामपंचायती स्वत: घेवून त्यांची अंमलबजावणी करु शकतात. शासन किंवा वरिष्ठ कार्यालयांची परवानगी घेण्याची आवश्यकता या गावांना नाही. त्यामुळे गावांनी आपल्या विकासासाठी या कायद्याचा उपयोग करुन घेणे आवश्यक आहे. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी दारुबंदीचा विषय उपस्थित केल्यानंतर दारुबंदीसाठी गावे स्वत:च निर्णय घेवू शकतात. पेसा गावांनी दारुबंदीचे ठराव घेवून दारुबंदी करावी, असे आवाहन तिवारी यांनी केले. पेसा कायद्याच्या उत्कृष्ठ अंमलबजावणीसाठी कायद्यातील तरतुदीप्रमाणे समित्यांचे गठण होणे आवश्यक आहे. या गावांनी अशा सर्व समित्या तातडीने गठित कराव्यात. कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करावा, कायद्यांतर्गत गौण खनिज आणि नैसर्गिक साधन-संपत्तीवर थेट मालकी हक्क देण्यात आला आहे. यातून गावाकऱ्यांनी रोजगाराचे साधन उपलब्ध करुन गावाचा विकास साधावा. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी कायद्यातील तरतुदी आणि गावकऱ्यांना असलेले अधिकार यावर प्रकाश टाकला. पेसा कायद्याने गावांना स्वायत्त संस्था बनविली आहे. आपल्या विकासाचे सर्व निर्णय स्वत: घेवून त्यावर अंमलबजावणी करण्याचा मोठा अधिकार या कायद्याने गावाकऱ्यांना दिला आहे. त्याचा उपयोग करत पेसा गावांनी आपले गाव आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि आदर्श बनवावे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह आदी मान्यवरांचीही यावेळी भाषणे झाली. पांढरकवडा येथे झालेल्या या कार्यशाळेत उपस्थित सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पेसा कायद्याची सविस्तर माहिती आणि गावकऱ्यांच्या अधिकाराबाबत संपूर्ण दिवसभर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेस १६४ ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक तसेच पदाधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)