शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

भारत उभा करावयाचा असेल तर जातीयवाद संपवा

By admin | Updated: April 12, 2017 00:09 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व देशभक्तीचे होते. त्यांनी धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाची सांगड भारतीय संविधानात घातली.

श्रीपाल सबनिस : पुसद येथे आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वातील चौथे प्रबोधन पुष्प, श्रोत्यांचा प्रतिसाद पुसद : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व देशभक्तीचे होते. त्यांनी धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाची सांगड भारतीय संविधानात घातली. राज्यघटनेत सर्वांना स्वातंत्र्य आहे. बाबासाहेबांच्या कर्तृत्व व नेतृत्वामुळे संपूर्ण जग प्रभावीत झाले होते. बाबासाहेबांचा जन्म जरी भारतात झाला असला तरी त्यांच्या बौद्धीक विकास हा उदारमतवादी राष्ट्रांमध्ये झाला. धर्म हा न्याय देणारा व दु:खातून मुक्त करणारा असतो. मात्र हिंदू धर्माने बाबासाहेबांना छळले. भारत उभा करावयाचा असेल तर जातीयवाद संपला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.श्रीपाल सबनिस यांनी केले. पुसद येथे आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वातील चौथे प्रबोधन पुष्प पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनिस यांनी गुंफले. यावेळी ते बोलत होते. महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब जयंती उत्सव समितीच्यावतीने स्थानिक पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वानिमित्त आयोजित प्रबोधनातील ‘राष्ट्रभक्त आंबेडकर आणि भारताचे भविष्य’ या विषयावर ते बोलत होते.अध्यक्षस्थानी दीपक आसेगावकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड.आशीष देशमुख, डॉ.भानुप्रकाश कदम, डॉ.उत्तम खांबाळकर, मिलिंद दहेकर, ललिता सबनिस, डॉ.राजेश गाढवे, गोवर्धन मोहिते, प्रमोद सोनटक्के आदींची उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी समितीचे मिलिंद हट्टेकर, महेश खडसे, अनिल हट्टेकर, प्रा.विलास भवरे, प्रा.महेश हंबर्डे, विलास खडसे, समाधान केवटे, रामदास कांबळे, मनोज खिराडे, साहेबराव गुजर, अशोक वाहुळे, भगवान हनवते, भारत अंभोरे, बाळासाहेब कांबळे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)