शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

ऐन पावसाळ्यातच अतिक्रमण हटाव मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST

विविध भागात घरे, झोपड्या व तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या दुकानांचे अतिक्रमण हटविले जात आहे. कित्येकांवर पावसाळ्यात बेघर होण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे व्यावसायिक आतापर्यंत घरातच होते. अजूनही त्यांचे व्यवसाय सुरु झालेले नाही. काहींनी कर्ज काढून उपजीविकेसाठी टपऱ्या उभ्या केल्या. मात्र अतिक्रमण विभागाने कोणतीही सूचना न देता थेट टपऱ्या नष्ट केल्या.

ठळक मुद्देटपऱ्या-पानठेले हटविले : आधीच लॉकडाऊन, त्यात उपजीविकेच्या साधनावर बुलडोजर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना व लॉकडाऊनमुळे आधीच शहरातील व्यवसाय ठप्प आहे. कुटुंबाची उपजीविका चालवावी कशी याची चिंता आहे. परंतु नगरपरिषदेने ऐन पावसाळा सुरू होताच शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली. यात उपजीविकेचे साधनच नष्ट करण्यात आले. शुक्रवारी शहरातील रस्त्याच्या कडेला असलेले पानठेले, चहा टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले. यामुळे हे व्यावसायिक आणखी अडचणीत सापडले आहे.लॉकडाऊन काळात सर्व काही ठप्प होते. मात्र पालिकेने ऐन पावसाळ्यातच ही मोहीम हाती घेतली. विविध भागात घरे, झोपड्या व तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या दुकानांचे अतिक्रमण हटविले जात आहे. कित्येकांवर पावसाळ्यात बेघर होण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे व्यावसायिक आतापर्यंत घरातच होते. अजूनही त्यांचे व्यवसाय सुरु झालेले नाही. काहींनी कर्ज काढून उपजीविकेसाठी टपऱ्या उभ्या केल्या. मात्र अतिक्रमण विभागाने कोणतीही सूचना न देता थेट टपऱ्या नष्ट केल्या. सूचना असती तर व्यावसायिकांना आपल्या टपऱ्या हलविणे सहज शक्य झाले असते. पालिकेच्या या अतिरेकी कारवाईचा व्यावसायिकांकडून निषेध केला जात आहे. दुकाने बंद करून व्यावसायिक घरी गेले असताना हे अतिक्रमण काही भागात उचलले गेले. त्यामुळे या व्यावसायिकांपुढे पुन्हा व्यवसाय सुरू करायचा कसा हे नवीन संकट उभे झाले आहे. रस्त्यावर नसलेले आतल्या भागातील अतिक्रमण-टपऱ्याही उचलल्या गेल्या. व्यावसायिकांवर अचानक हा अतिक्रमणाचा बुलडोजर चालविला गेल्याने यवतमाळ नगरपरिषदेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लॉकडाऊनमधून बाहेर निघून कसे बसे उभे होण्याचा प्रयत्न करीत असताना पालिकेने त्यांचे पुन्हा कंबरडे मोडल्याचे चित्र आहे.आम्हाला नुकसानभरपाई द्या, अतिक्रमणधारकांची मागणीव्यावसायिकांवर शुक्रवारी अतिक्रमणाचे नवे संकट ओढावले. यामुळे त्यांच्या हातातला संपूर्ण रोजगार उद्ध्वस्त झाला आहे. आता जगायचे कसे, कुटुंब चालवायचे कसे असा प्रश्न व्यावसायिकांपुढे निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी नुकसानभरपाई मिळावी आणि पथकातील अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा,अशी मागणी अतिक्रमणधारकांनी केली आहे. या अतिक्रमणधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांना मागण्यांचे निवेदन देऊन व्यथा मांडण्यात आली. यावेळी उमेश करोडे, अरुण जमनारे, संदीप गवई, महादेव वानखेडे, वंदना खैरकार, वेणू नेवरे, प्रीती गवई, प्रमोद निपाने, अशोक लोखंडे, विलास आडे, अनिल करोडदेव, राम इरवे, कल्पना साठवणकर, कल्पना कडू, राजेंद्र लोहटे, अरविंद खंदाडे, दीपक भाकरे, देवानंद मानकर, भारत वंजारी आदी व्यावसायिक उपस्थित होते.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण