शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

आज जिल्हा बॅंक अध्यक्षाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 05:00 IST

काॅंग्रेसचे खासदार बाळासाहेब धानाेरकर, माजी आमदार वामनराव कासावार यांनी टिकाराम कोंगरे यांचे नाव पुढे करत अध्यक्षपद वणी विभागात द्यावे, अशी मागणी लावून धरली, तर शिवाजीराव माेघे, मनाेहरराव नाईक यांनी मनीष पाटील यांचे नाव सुचविल्याने अध्यक्षाच्या नावावर एकमत हाेऊ शकले नाही. संजय देशमुख, प्रकाश पाटील, देवसरकर यांच्याकडून अध्यक्षपदासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत काय घडामाेडी हाेतील याबाबत अनिश्चितता आहे.

ठळक मुद्देआघाडीत बिघाडीची शक्यता : वणीतील दावेदारामुळे बैठकीत सूर जुळे ना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा अध्यक्ष आज, साेमवारी निवडला जाणार आहे. बॅंकेत महाविकास आघाडीला प्रचंड बहुमत मिळाले असून,  काॅंग्रेसकडे सर्वाधिक संचालक आहेत. अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी यवतमाळातील रेमंडच्या विश्रामगृहावर आघाडीच्या नेत्यांची बैठक रविवारी झाली. या बैठकीत दाेन दावेदार काॅंग्रेसकडून सुचविण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन वेळेवर आघाडीत बिघाडी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.काॅंग्रेसचे खासदार बाळासाहेब धानाेरकर, माजी आमदार वामनराव कासावार यांनी टिकाराम कोंगरे यांचे नाव पुढे करत अध्यक्षपद वणी विभागात द्यावे, अशी मागणी लावून धरली, तर शिवाजीराव माेघे, मनाेहरराव नाईक यांनी मनीष पाटील यांचे नाव सुचविल्याने अध्यक्षाच्या नावावर एकमत हाेऊ शकले नाही. संजय देशमुख, प्रकाश पाटील, देवसरकर यांच्याकडून अध्यक्षपदासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत काय घडामाेडी हाेतील याबाबत अनिश्चितता आहे. बैठकीतील निर्णयाबाबत  महाविकास आघाडीकडून  अधिकृतरीत्या ठाेस असे काही सांगण्यात आले नाही. केवळ संचालकाशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली आहेत. पक्षांना पद वाटून दिली जातील, असा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष व दाेन उपाध्यक्ष करण्यावर एकमत झाले.  प्रत्येक पक्षाला एक पद दिले जाईल, असा निर्णय घेतला असून उमेदवार काेण याची घाेषणा साेमवारी सकाळी ११ वाजता करण्यात येईल.  आघाडीच्या बैठकीला पालकमंत्री संजय राठाेड, खासदार बाळासाहेब धानाेरकर, आमदार डाॅ. वजाहत मिर्झा,  माजी मंत्री मनाेहरराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव माेघे, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, माजी आमदार ख्वाॅजा बेग, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार विजय खडसे, वसंत घुइखेडकर, बाळासाहेब मांगुळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड उपस्थित हाेते. जिल्हा काॅंग्रेस कमिटी कार्यालयात सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.

असा ठरला फाॅर्म्युलामहाविकास आघाडीच्या बैठकीत बँकेतील सत्ता स्थापनेचा फाॅर्म्युला निश्चित झाला आहे. अध्यक्षपद काँग्रेसला व शिखर बँकेवर सदस्यही काँग्रेसचा, शिवसेना व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उपाध्यक्ष व प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य घेतला जाणार आहे. अध्यक्षपदासाठी आघाडीच्या नेत्यांनी सर्व संचालकांना स्वतंत्र बोलावून त्यांचे मत जाणून घेतले. यावेळी मनीष पाटील, प्रकाश पाटील देवसरकर व टिकाराम कोंगरे यांनी अध्यक्षपदासाठी प्रस्ताव नेतेमंडळींपुढे सादर केला. आघाडीच्या नेत्यांची सोमवारी सकाळी ११ वाजता पुन्हा बैठक आहे. 

 

टॅग्स :bankबँक