शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
2
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
3
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
4
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
5
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
6
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
7
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
9
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
10
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
11
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
12
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
13
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
14
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
15
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
16
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
17
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
18
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
19
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
20
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?

आठ तासांची शाळा ! घेता का जीव ?

By admin | Updated: November 16, 2015 02:22 IST

नवीन शैक्षणिक धोरणात शाळा आठ तासांची होणार असल्याचे संकेत मिळताच जिल्ह्यातील शिक्षकांनी कान टवकारले आहेत आणि डोळेही वटारले आहेत.

यवतमाळ : नवीन शैक्षणिक धोरणात शाळा आठ तासांची होणार असल्याचे संकेत मिळताच जिल्ह्यातील शिक्षकांनी कान टवकारले आहेत आणि डोळेही वटारले आहेत. आधीच आमच्या मागे सतराशे साठ कामे लावली, त्यात शाळेचे दोन तास वाढवून ‘घेता का जीव?’ अशी चर्चा सध्या जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये सुरू आहे.केंद्र शासनाने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी राज्य पातळीपासून थेट गाव पातळीपर्यंत कार्यशाळा आयोजित करून नागरिकांची शिक्षणाविषयीची मते जाणून घेण्याचा प्रयत्न झाला. या कार्यशाळा आटोपल्यानंतर शासनाच्या संकेतस्थळावर नव्या शैक्षणिक धोरणाविषयीचा अहवाल टाकण्यात आला आहे. त्यात अनेक चांगल्या बाबी अंतर्भूत करण्यात आले आहेत. मात्र, त्यासोबतच शाळेची वेळ सहा तासांच्या ऐवजी आठ तास करण्याचीही शिफारस नमूद करण्यात आली आहे. यातील सहा तास प्रत्यक्ष अध्यापन होईल आणि दोन तासांमध्ये शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी देता येईल, असे नमूद करण्यात आले आहे. या अहवालावर कुणास काही आक्षेप असल्यास किंवा काही सूचना मांडावयाच्या असल्यास २३ नोव्हेंबरपर्यंत सूचना-हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी स्वतंत्र ई-मेल आयडी देण्यात आला आहे.नव्या शैक्षणिक धोरणाचा हा अहवाल जिल्ह्यातील शिक्षकांना भावला. मात्र, त्यातील आठ तासांची शाळा करण्याचा मुद्दा अनेकांना झोंबणारा ठरला. अहवाल पाहताच शिक्षक वर्तुळात अक्षरश: वादळच उठले आहे. सध्या दिवाळीच्या सुट्या भोगत असलेल्या शिक्षकांना या अहवालावर आवाज उठविण्यासाठी सवड मिळालेली नाही. मात्र, व्हॉट्सअ‍ॅपवरून संतप्त प्रतिक्रिया शिक्षक एकमेकांना कळवत आहेत. तर संघटनांच्या नेत्यांनी मात्र या निर्णयाच्या विरोधात थेट न्यायालयात जाण्याचा सूर आळवला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय अद्याप अंतिम झालेला नाही. अहवालातील शिफारशी केवळ शासनाने सर्वसामान्यांपुढे मांडल्या आहेत. त्यावर सूचना असल्यास पाठवावयाच्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील शिक्षकांनी जणू निर्णयच झाला, या आविर्भावात आंदोलनाची भाषा सुरू केली आहे.अहवाल संकेतस्थळावर झळकताच शिक्षकांनी त्याविरोधात प्रतिक्रिया नोंदविणे सुरू केले आहे. अहवालातील आठ तासांच्या शाळेची तरतूद नाकारण्यासाठी सर्वात पहिला मार्ग शिक्षकांकडे उपलब्ध आहे, तो म्हणजे शासनाला ई-मेल पाठविणे. जिल्ह्यातून रविवारी एकाच दिवसात शेकडो शिक्षकांनी विरोधाचे ई-मेल पाठविले आहेत. २३ नोव्हेंबरपर्यंत ई-मेल पाठविण्याचा हा सिलसिला सुरूच राहणार आहे. मात्र, देशभरातील नागरिकांच्या मतांचा हवाला देत तयार केलेला अहवाल काही शिक्षकांच्या विरोधामुळे बदलतो की नाही, हा कळीचा मुद्दा बनला आहे. त्याचा निकाल २३ नोव्हेंबर नंतरच समजणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)त्यापेक्षा अशैक्षणिक कामे कमी करासध्या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षक बेजार झाले आहेत. वर्षभरात तऱ्हेतऱ्हेची माहिती शिक्षकांकडून मागविली जाते. पर्यवेक्षकीय यंत्रणेकडूनही त्यांना सहकार्य केले जात नाही. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीच्या कामावरून नुकतेच शिक्षकांनी आपल्या विरोधाची ताकद दाखवून दिली होती. या अशैक्षणिक कामांमुळे सध्याच शिक्षक जवळपास दहा तास काम करीत आहेत, असा जिल्ह्यातील शिक्षकांचा सूर आहे. शाळेची वेळ सहाऐवजी आठ तास करण्यापेक्षा ही अशैक्षणिक कामे कमी केल्यास शिक्षकांचा पूर्ण वेळ अध्यापनासाठी मिळेल, अशी शिक्षकांची मागणी आहे.बाल मानसशास्त्राचा विचारच नाहीशाळेची वेळ वाढविताना शासनाने बालमानसशास्त्राचा अजिबात विचार केलेला नाही. मूल एका ठिकाणी फार काळ बसू शकत नाही. एकीकडे हसत-खेळत आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू असताना आठ-आठ तास मुलांना अडकवून ठेवणे चुकीचे आहे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. फिनलँड, बेल्जियमसारख्या देशात पाच-सहा तास शाळा घेऊनही तेथील शिक्षणाचा दर्जा उत्तम आहे. आठ तासांची शाळा केली आणि शिक्षकांची शिकवण्याची मानसिकताच नसली, तर काय उपयोग? शिक्षकांना आठ तास शाळेत ठेवले जाणार असेल तर त्यांना मुख्यालयी मुक्कामी राहण्याचा आग्रह धरू नये, असाही सूर आळविला जात आहे.