शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

दोन साखर कारखान्यांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न

By admin | Updated: August 26, 2014 23:44 IST

अवसायनात निघून बंद पडलेल्या जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. शासनस्तरावर हालचालींना वेग आला असून, सहकार विभागाच्या मंजुरीनंतर हा

अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव : थकीत कर्जाबाबत निर्णय होणार मुकेश इंगोले - दारव्हा अवसायनात निघून बंद पडलेल्या जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. शासनस्तरावर हालचालींना वेग आला असून, सहकार विभागाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. शासकीय येणे आणि थकीत कर्जाबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. दारव्हा तालुक्यातील बोदेगाव येथील जयकिसान सहकारी साखर कारखाना आणि महागाव तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. आर्थिक डबघाईस आलेले हे दोन्ही कारखाने अवसायनात येऊन बंद पडले. त्यानंतर दोन्ही कारखाने भाडे तत्त्वावर देऊन सुरू करण्याचा प्रयत्न केला. वारणा समूहाने दोन्ही कारखाने भाडेतत्त्वावर घेतले. मात्र करार मोडीत काढत कारखाना बंद केला. त्यामुळे जयकिसान सहकारी साखर कारखाना २०१० पासून बंद आहे. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दोन जिल्हे आणि सहा तालुके आहेत. दोन्ही कारखाने बंद असल्याने या भागातील ऊस उत्पादक कामगार, कर्मचारी देशोधडीला लागले आहे. कारखान्याची मालमत्ताही चोरीस जात आहे. अशा स्थितीत सदर कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. विदर्भातील सहकारी साखार कारखाने सुरू करण्याबाबतचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह या विभागातील नेते व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, आमदार विनय कोरे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक, साखर आयुक्त, प्रादेशिक साखर सहसंचालक उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही कारखाने भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कारखान्याकडे असलेले शासकीय रकमांची वसुली लांबणीवर टाकण्यात आली. शासन थकहमीवरील कर्जाच्या परतफेडी बाबत वित्तीय संस्थांच्या स्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात यावा. तसेच थकहमी शिवाय असलेल्या कर्जाबाबत वित्तीय संस्थांशी विचार विनिमय करण्याबाबत या बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीनंतर साखर आयुक्तांनी कारखान्याच्या अवसायकांशी चर्चा केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. जयकिसान साखर कारखाना सुरू करण्यासाठी अ‍ॅड़ शंकरराव राठोड, वसंतराव घुईखेडकर, उत्तमराव शेळके, शामराव देशमुख, पंढरीनाथ सिंह, सुभाष राठोड यांनी पुढाकार घेतला आहे.