शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते, रेल्वे प्रकल्पांच्या भूसंपादनात खोडा

By admin | Updated: January 22, 2017 00:05 IST

जिल्ह्याच्या विकासाकरिता महत्वाकांक्षी असलेल्या वर्धा-यवतमाळ- नांदेड रेल्वे प्रकल्प आणि नागपूर-यवतमाळ-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग

अधिकारी व्यस्त निवडणूक प्रक्रियेत :२२०० हेक्टरच्या मोबदल्याची प्रकरणे रखडली सुरेंद्र राऊत  यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाकरिता महत्वाकांक्षी असलेल्या वर्धा-यवतमाळ- नांदेड रेल्वे प्रकल्प आणि नागपूर-यवतमाळ-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे खिळ बसली आहे. भूसंपदानाची यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने कामाची गती मंदावली आहे. जिल्हा प्रशासनाने रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात या दोन्ही महत्वपूर्ण प्रकल्पाचे काम प्रभारी भूसंपादन अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. या अधिकाऱ्यांकडे रस्ते प्रकल्प भूसंपादनाची जबाबदारी असताना, त्यांना रेल्वे प्रकल्पाची भूसंपादन जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर आता बेंबळा प्रकल्प भूसंपादन उपजिल्हाधिकारी, लघु सिंचन भूसंपादन उपजिल्हाधिकारी, या दोन स्वतंत्र विभागाचा प्रभारही देण्यात आला आहे. या दोन्ही विभागात न्यायालयीन प्रकरणे असल्याने त्यांचा पूर्ण वेळ कोर्टकचेरीत जातो. अशा स्थितीत त्यांना महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रकरणे निकाली काढणे कठीण झाले आहे. आता दोन महत्वपूर्ण प्रकल्पांचे भूसंपादन करण्यात व्यस्त आलेल्या अधिकाऱ्यांनाच निवडणुकीच्या कामात जुंपण्यात येत आहे. यापूर्वी त्यांच्याकडे नगरपरिषद निवडणुकीची जबाबदारी होती. आता तर थेट उमरखेड तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त झाली आहे. या प्रक्रियेत संपूर्ण महिना लोटणार असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने किमान या प्रकल्पासाठी पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र राजकीय पुढारीच याबाबत फारसे गंभीर नसल्याने ही स्थिती निर्माण झाली. स्थानिक पुढाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकल्प पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल, हे अनिश्चित आहे. १२०० हेक्टर जमीन संपादनाचा तिढा रेल्वे प्रकल्पाचे एकूण ९२ अवॉर्ड असून १२०० हेक्टर जमीन संपादीत करावयाची आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्गासाठीसुद्धा भूसंपादन मोहीम राबवायची आहे. त्याकरिता यवतमाळ, राळेगाव, उमरखेडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची समिती तयार करण्यात आली. त्याचे संनियंत्रण रस्ते प्रकल्प उपजिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले. या राष्ट्रीय महामार्गासाठी एक हजार हेक्टर जमीन संपादीत केली जाणार आहे. मात्र अजून ही प्रक्रिया प्राथमिक अवस्थेतच आहे.